आदर पूनावाला यांनी शेवटच्या क्षणी नाकारली ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, १०० कोटी लसीचे डोस करण्यासाठी उभारणार होते प्रकल्प


निधीअभावी कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन वाढविण्यात अडचण येत असल्याचे आदर पूनावाला म्हणत असले तरी त्यांनी गुंतवणुकीचे अब्जावधी रुपयांचे प्रस्ताव नाकारले आहेत. १०० कोटी डोस निर्मितीची क्षमता असलेले कोरोना प्रतिबंधक लसीचे नवीन प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ७६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पूनावाला यांना अपेक्षित होती. त्याप्रमाणे प्रस्तावही आले होते. मात्र, शेवटच्या क्षणी हे प्रस्ताव नाकारण्यात आले.Adar Poonawala rejects last-minute investment of Rs 75,000 crore, plans to do 100 crore vaccine doses


विशेष प्रतिनिधी

लंडन : निधीअभावी कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन वाढविण्यात अडचण येत असल्याचे आदर पूनावाला म्हणत असले तरी त्यांनी गुंतवणुकीचे अब्जावधी रुपयांचे प्रस्ताव नाकारले आहेत.

१०० कोटी डोस निर्मितीची क्षमता असलेले कोरोना प्रतिबंधक लसीचे नवीन प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ७६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पूनावाला यांना अपेक्षित होती. त्याप्रमाणे प्रस्तावही आले होते. मात्र, शेवटच्या क्षणी हे प्रस्ताव नाकारण्यात आले.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी पूनावाला कुटुंबियांच्या मालकीची आहे. टीपीजी कॅपीटल, अबुधाबीच्या एडीक्यू आणि सोदी अरेबिया पब्लिक फंड इनव्हेस्टमेंट फंड (पीआयएफ) या कंपन्यांनी सीरममध्ये गुंतवणुकीचे प्रस्ताव दिले होते.

मात्र, व्हॅल्यूएशनबाबत सहमती झाली नसल्याने पूनावाला यांनी हे प्रस्ताव नाकारले. गेल्या वर्षी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे जागतिक गुंतवणूकदारांकडून अब्जावधी रुपयांचे प्रस्ताव आले होते. मात्र, शेवटच्या क्षणी हे करार करण्यास आदर पूनावाला यांनी नकार दिला.

बिल अ‍ॅँड मेलिंडा गेटस फाऊंडेशनने सीरम इन्स्टिट्यूटला ३०० मिलीयन डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली होती. जगातील गरीब देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्यासाठी ही मदत होती. गेटस फाऊंडेशनकडून हा निधी मिळत असल्याने पूनावाला यांनी इतर गुंतवणुकीचे प्रस्ताव नाकारले असेही म्हटले जात आहे.

कोरानावरील लसीसह सीरमच्या इतर लसींच्या उत्पादनासाठी नव्याने प्रकल्प उभारण्यासाठीच्या खर्चाचे मूल्य १० बिलीयन डॉलर्स (सुमारे ७५ हजार कोटी रुपये) असल्याचे पूनावाला कुटुंबाचे म्हणणे आहे. सीरमने आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपन्यांशी करार केले आहेत.

अ‍ॅस्ट्राझेनेका आणि नोव्हावॅक्स या कंपन्यांशी झालेल्या करारात कोरोना प्रतिबंधक लसीचे १०० कोटी डोस निर्माण करण्यात येणार आहेत. यापैकी अर्धे म्हणजे ५० कोटी भारतासाठी ठेवण्यात येणार आहेत. मात्र, पूनावाला यांनी शेवटच्या क्षणी आपला विचार बदलला आणि १०० गुंतवणुकीस नकार दिला.

Adar Poonawala rejects last-minute investment of Rs 75,000 crore, plans to do 100 crore vaccine doses

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*