नाशिक : कोलकाता हत्याकांडाचा कलंक आज तब्बल 80 वर्षांनी पुसला. कोलकत्याच्या सुऱ्हावर्दी अवेन्यू रोडचे नाव बदलून गोपाल मुखर्जी रोड केले. कोलकता महापालिकेने आज हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये खऱ्या अर्थाने हिंदूंचे राज्य सुरू झाल्याची द्वाही फिरली.The stigma of the Kolkata massacre erased; Suhrawardy Avenue renamed Gopal Mukherjee Road!!
– सुऱ्हावर्दीने घडविले हिंदू हत्याकांड
स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीसाठी हिंसाचाराचा हैदोस घातला होता. मुस्लिम लीगचे प्रमुख मोहम्मद अली जिना यांनी डायरेक्ट ॲक्शनची धमकी दिली होती. या डायरेक्ट ॲक्शन मध्येच 1946 मध्ये कोलकात्यामध्ये हिंदूंचा प्रचंड नरसंहार झाला होता. त्यावेळी हुसेन शाहिद सुऱ्हावर्दी हा मुस्लिम लीगचा नेता कोलकत्यामध्ये मुस्लिम लीगचे नेतृत्व करत होता. याच्याच चिथावणीमुळे बंगाली मुस्लिमांनी कोलकत्यामध्ये हिंसाचाराचे थैमान घालून तब्बल 5000 हिंदूंचे शिरकाण केले होते.
पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सुद्धा याच हुसेन शाहिद सुऱ्हावर्दी यानेच पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात हिंदू विरुद्ध मोठा हिंसाचार घडवून आणला होता. नंतर हुसेन शाहिद सुऱ्हावर्दी याने पाकिस्तानच्या राजकारणात वर्चस्व गाजविले होते. तो 1956 ते 57 अशा दोन वर्षांच्या काळात पाकिस्तानचा पंतप्रधान सुद्धा होता.
– कोलकत्याच्या रस्त्यावर 80 वर्षे होता कलंक
याच हुसेन शाहिद सुऱ्हावर्दीचे नाव कोलकत्यातला एका रस्त्याला दिले गेले होते. त्या रस्त्याचे नाव सुऱ्हावर्दी अवेन्यू रोड असे होते. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी फाळणी झाल्यानंतर सुद्धा त्या रस्त्याचे नाव जसेच्या तसे कायम होते कारण त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, नंतर कम्युनिस्ट आणि त्यानंतर तृणमूळ काँग्रेस यांचे राज्य होते. यापैकी कुठल्याही राजवटीने सुऱ्हावर्दी अवेन्यू रोड हे नाव बदलण्याचे धाडस दाखविले नव्हते. पण पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर धडाक्याने निर्णय घेतले गेले आणि आज 21 जून 2026 रोजी कोलकता हत्याकांडाचा मास्टरमाईंड मोहम्मद शाहिद सुऱ्हावर्दी याचे नाव पुसले गेले.
– हिंदू पराक्रमी वीर गोपाल मुखर्जी
त्याचवेळी या रस्त्याला गोपाल मुखर्जी असे नाव दिले गेले. हे तेच गोपाल मुखर्जी उर्फ गोपाल पाठा होते, ज्यांनी कोलकत्ता हत्याकांडाच्या वेळी हिंदूंचा जीव वाचविण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले होते. त्यांनी हिंदूंचे संघटन बांधले आणि मुसलमानांच्या हिंसाचाराचा जबरदस्त प्रतिकार केला. तुम्ही एक हिंदू मारलात तर आम्ही १० मुसलमान मारू असे त्यांनी जाहीर केले होते. दोन दिवसांच्या हिंसाचारानंतर मुस्लिम लीगच्या हे लक्षात आले की हिंदू संघटित झाले आणि गोपाल पाठा असेच आक्रमक राहिले तर आपले काही खरे नाही त्यामुळे मुस्लिमांनी हिंसाचार आटोपता घेतला.
– कोलकात्यातला पुसला कलंक
गोपाल मुखर्जी यांचे वडिलोपार्जित मांसविक्रीचे दुकान होते. त्यांचे अनेक मुसलमान मित्र सुद्धा होते. कोलकत्याच्या दंग्यात त्यांच्या काकांनी काही मुस्लिम परिवारांना दंग्यापासून वाचाविले होते. पण ज्यावेळी मुस्लिम लीगने हिंसाचाराचे टोक गाठले, त्यावेळी गोपाल मुखर्जी उर्फ गोपाल पाठा यांनी हिंदूंचे संघटन बांधून मुस्लिमांच्या हिंसाचाराचा धडाकेबाज प्रतिकार केला. त्यांच्याच स्मृतिप्रीत्यर्थ कोलकता महापालिकेने आज सुऱ्हावर्दी अवेन्यू रोडचे नामांतर करून गोपाल मुखर्जी रोड असे केले. पश्चिम बंगालच्या हिंदुत्ववादी सरकारने कोलकता हिंसाचाराचा कलंक पुसला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App