पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील जनतेची नरेंद्र मोदींनाच पसंती; बावनकुळेंच्या महाविजय संकल्प यात्रेत आले दिसून

Chandrashekhar Bawankule

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील असा बावनकुळेंनी व्यक्त  केला विश्वास.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविजय २०२४ संकल्प यात्रेच्या’ निमित्तानं आतापर्यंत २१ लोकसभा मतदारसंघात प्रवास केला. या प्रवासात त्यांनी ३३ हजार ७१० नागरिकांशी थेट संवाद साधला आणि पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती द्याल? असा प्रश्न विचारला. त्यापैकी ३३ हजार ६९७ लोकांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी  यांना पसंती दिली आणि केवळ १३ लोकांनी इतर पक्षातील नेत्यांना पसंती दिली. त्यातील फक्त चौघे राहुल गांधी समर्थक होते. The people of Maharashtra prefer Narendra Modi for the post of Prime Minister Bawankule

याबाबत बावनकुळे यांनी ट्वीटद्वारे माहिती देताना सांगितले की, गेल्या साडेनऊ वर्षांत नरेंद्र मोदींनी केलेला विकास, जगभरात उंचावलेली भारताची मान, आत्मनिर्भर भारतासाठी केलेला संकल्प यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने मोदींच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील जनतेच्या याच प्रेमाच्या बळावर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील हा ठाम विश्वास आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’, हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र भाजपा कटिबद्ध आहे.

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या दोन महिन्यांत चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ – वाशीम, अकोला, बुलडाणा, अमरावती, रामटेक, नागपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक ,बारामती, मावळ,शिरूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, हातकणंगले, ठाणे, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात प्रवास करून जनतेशी थेट संवाद साधला आहे.

The people of Maharashtra prefer Narendra Modi for the post of Prime Minister Bawankule

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात