विशेष प्रतिनिधी
उन्नाव : उत्तर प्रदेशातील अमेठीत आपला पराभव निश्चित आहे, याची धास्ती घेऊन वेळीच केरळ मधल्या वायनाडला गेलेल्या राहुल आणि प्रियांका गांधींना भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी आव्हान दिले आहे. गांधी बहीण – भावापैकी कोणीही आपल्यासमोर उभे राहून उत्तर प्रदेशातल्या उन्नाव मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान साक्षी महाराज यांनी दिले आहे. bjp mp challenge to rahul gandhi and priyanka gandhi election unnav
2019 च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव केला, पण या पराभवाची चाहूल आधीच लागल्यामुळे राहुल गांधींनी त्याच वेळी केरळ मधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवली आणि ते तिथून निवडून येऊन लोकसभेत पोहोचले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी तामिळनाडूतल्या कन्याकुमारी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता माध्यमांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी राहुल गांधींना उत्तर प्रदेशातील आपल्या उन्नाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे.
2024 ची लोकसभा निवडणूक सोनिया गांधी लढविणार नसल्याच्या बातम्या आहेत. सोनिया गांधींची तब्येत बरी नसते. त्यामुळे त्या तशाही ऍक्टिव्ह राजकारणातून बाजूला गेल्या आहेत. मध्यंतरी “इंडिया” आघाडीच्या बैठकीत बैठकांसाठी पुढाकार घेणे सोडले तर त्या बाकीच्या कुठल्या बैठकांमध्ये सहभागी झाल्याची उदाहरणे नाहीत. त्यामुळे रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी यांच्या ऐवजी स्वतः प्रियांका गांधी लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता काँग्रेसच्या वर्तुळात बोलली जात आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार साक्षी महाराज यांनी गांधी बहीण भावांना उन्नाव लोकसभा मतदारसंघातून आपल्यासमोर निवडणूक लढवण्याचे आव्हान देणे याला विशेष राजकीय महत्त्व असल्याचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App