वझिरीस्तानमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : कॅनडा असो किंवा पाकिस्तान, गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या शत्रूंना परदेशात सतत मारले जात आहे. दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांनी भारताच्या आणखी एका शत्रूला ठार केलं आहे. लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक याची वझिरीस्तानमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. Indias most wanted Lashkar e Jabbar founder Dawood Malik killed in Pakistan
दाऊद हा भारतातील मोस्ट वाँटेड जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरच्या खूप जवळ होता. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तात मलिक याच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. वृत्तानुसार, उत्तर वझिरीस्तानमधील मिराली येथे मलिकला ठार करण्यात आले.
दहशतवादाचा वापर धोरण आणि भारतविरोधी हत्यार म्हणून करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. दाऊदसारख्या दहशतवाद्याच्या हत्येच्या घटनेने पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली आहे. दुसरीकडे, ज्यांनी मलिकची हत्या केली ते गुन्हा करून पळून जाण्यात यशस्वी झाले.
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावरून आणखी एका अज्ञात व्यक्तीचा विकृत मृतदेह ताब्यात घेतला आहे. काही अहवालात असे म्हटले आहे की मलिक एका खासगी दवाखान्यात असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याची हत्या करण्यात आली. लष्कर-ए-जब्बारच्या वाढीतील त्याची भूमिका आणि दहशतवाद्यांच्या व्यापक नेटवर्कशी असलेले त्याचे संबंध यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात येत होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App