महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित वादावर बोलण्यास पक्षाने नकार दिला आहे. महुआ यांच्यावर संसदेत अदानी समूहाशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.TMC kept distance from Mahua Moitra controversy Nishikant Dubey’s complaint to the Ombudsman

या आरोपांबाबत तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगाल सरचिटणीस आणि प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, याप्रकरणी पक्षाला काहीही म्हणायचे नाही. या वादात जी व्यक्ती गुंतलेली आहे, त्यांनीच याविषयी बोलावे, असे आम्हाला वाटते.



आणखी एका टीएमसी नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षाचे नेतृत्व कोणत्याही प्रकारच्या वादात पडू इच्छित नाही, त्यामुळे पक्ष या प्रकरणापासून अंतर राखेल.

भाजपने म्हटले – टीएमसीने महुआसोबत आहे की नाही हे स्पष्ट करावे

तृणमूल पक्षाच्या अशा वक्तव्याबाबत भाजप नेते राहुल सिन्हा म्हणाले की, पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष, टीएमसी अशा प्रकारे आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा टीएमसी नेत्यांना अटक केली जाते किंवा कोणत्याही वादात अडकतात तेव्हा पक्ष आपल्या जबाबदारीपासून दूर जातो. महुआ मोईत्रांना पाठिंबा आहे की नाही हे पक्षाने सांगावे.

निशिकांत यांची महुआंबाबत लोकपालकडे तक्रार

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शनिवारी महुआंवर आणखी एक गंभीर आरोप केला. निशिकांत यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले- एका खासदाराने काही पैशांसाठी देशाची सुरक्षा गहाण ठेवली. याबाबत मी लोकपालकडे तक्रार केली आहे.

ते म्हणाले की, संसदेचा आयडी दुबईतून उघडण्यात आला होता, त्यावेळी कथित खासदार भारतात होते. संपूर्ण भारत सरकार या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रावर (NIC) आहे. देशाचे पंतप्रधान, अर्थ विभाग, केंद्रीय एजन्सी येथे आहेत. TMC आणि विरोधी पक्षांना अजून राजकारण करायचे आहे का? निर्णय जनतेचा आहे. एनआयसीने ही माहिती तपास यंत्रणेला दिली आहे.

TMC kept distance from Mahua Moitra controversy Nishikant Dubey’s complaint to the Ombudsman

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात