आता नव्या वर्षात नऊ मीटर रूंदीपर्यंतच्या रस्त्यावर इमारत उभारताना २४ मीटर उंचीची मर्यादा असणार आहे.The new rules will be implemented from January, the height of buildings in all municipal boundaries will be reduced
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जानेवारी महिन्यापासून राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील इमारतींच्या उंची बाबत नवा नियम लागू होणार आहे. ३६ मीटर उंचीची मर्यादा कमी होऊन २४ मीटरपर्यंत केली जाणार आहे. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बांधकाम नियमावलीत एकसूत्रीपणा आणण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचे सांगितले जात आहे.
सर्वसाधारण तीन मीटर उंचीचा एक मजला असतो. ३६ मीटर उंचीमुळे ११ ते १२ मजली उंचीची इमारत होते. आता नव्या वर्षात नऊ मीटर रूंदीपर्यंतच्या रस्त्यावर इमारत उभारताना २४ मीटर उंचीची मर्यादा असणार आहे. त्यामुळे यापुढे ७ मजली इमारत पाहावयाला मिळणार आहे. या नव्या नियमामुळे शहरातील पुर्नविकास बांधकामामध्ये अडचणी येणार आहे. तसेच या परिणाम हा घरांच्या किंमती वाढण्यावर होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App