Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले- विलीनीकरणावर आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही बोलू, राऊतांच्या टीकेला महत्त्व नाही

Sunil Tatkare

विशेष प्रतिनिधी

सातारा : Sunil Tatkare आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एक आहोत. भाजपच्या विचारांशी प्रणित एनडीएमध्ये येण्यासाठी भूमिका ज्यांना सोबत यायचे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाची भूमिका ठरली, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलो, विलीनीकरणाबद्दल शरद पवार गटातील नेते बोलल्यानंतर आम्ही बोलू, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.Sunil Tatkare

सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपने कधीही आम्हाला कोणता निर्णय घ्यावा असे सांगितले नाही. आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेतो भाजप मित्रपक्ष म्हणून आमच्या निर्णयाच्या सोबत आहे. प्रफुल्ल पटेल आणि माझी काही वेगळी भूमिका नाही. शरद पवार यांनी माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली मी यशस्वीपणे काम केले. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्यात यावी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर आमची सुद्धा तीच भूमिका आहे.Sunil Tatkare



राऊत काय म्हणतात त्याला महत्त्व नाही

सुनील तटकरे म्हणाले की, संजय राऊत काय म्हणतात याला मी फारसे महत्त्व देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे प्रत्येक जण टीका करत असतो, संजय राऊत यांची टीका यापेक्षा काही वेगळी असेल असे मला वाटत नाही,

विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार?

सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनकरणाच्या संदर्भात शशिकांत शिंदे काय बोलले याबद्दल काही बोलणार नाही. पण इतर सहकार्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या ते अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच सुरू झाले. विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार? याचा खुलासास किंवा माहिती कळाली तर मला बोलता येईल.

वडेट्टीवारांनी आमच्या पक्षावर बोलू नये

सुनील तटकरे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी आमच्या पक्षावर बोलण्यापूर्वी चंद्रपूर मनपामध्ये काँग्रेसचा महापौर करावा. काँग्रेस अंतर्गत नगरसेवक पळवापळवी करणाऱ्या विजय वडेट्टीवारांनी आमच्या पक्षाबद्दल फारसे बोलण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी महापौर पदाकडे लक्ष दिले पाहिजे. आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली आणि 41 जांगावर उमेदवार निवडून आणले. आमचा पक्ष बळकट आहे. नेता निवडीचा अधिकार हा निवडून आलेला आमदारांचा असतो.

NCP Merger: Let Sharad Pawar’s Faction Speak First, Says Sunil Tatkare

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात