विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Srikant Shinde मी सुरतमध्येही शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवेन, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी काल कोल्हापूरातील सभेत केले होते. या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे. शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार, हे त्यांच्या तोंडून येणे खूप हास्यास्पद आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणालेत.Srikant Shinde
श्रीकांत शिंदे यांची आज कोल्हापूर येथे डॉक्टर संघटनसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या विचारापासून कोसो दूर निघून गेले, असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला, त्यांनाच मांडीवर बसवले
बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्याच काँग्रेसला मांडीवर बसवले. या निवडणुकीत जनताच तुम्हाला घरी बसवणार आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
घरातून बाहेर न पडणाऱ्यांना दीड हजारांची किंमत काय कळणार
श्रीकांत शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. 1500 रुपयांत काय होते, असे ते म्हणतात. गरिबांसाठी 1500 रुपये महत्त्वाचे आहेत. जे लोक स्वत:च्या घरातून कधी बाहेर पडली नाहीत. त्यांना दुसऱ्याच्या घरात काय सुरू आहे, हे कसे कळणार? 1500 रुपयांत मुलांची फी देता येते, घर खर्च भागू शकतो, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
आता योजनांमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला
त्यांची देण्याची दानत नाही, ते फक्त घेण्याचे काही बंद करण्याचे काम करू शकतात. सत्तेत असताना अडीच वर्षांत अनेक गोष्टी स्थगित केल्या. पण, आमचे सरकार आल्यावर आम्ही रेकॉर्डब्रेक योजना सुरू केल्या. आता योजनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App