हॅरिस यांच्या भाषणादरम्यान त्यांचे समर्थक चांगलेच उत्साहित दिसत होते Kamala Harris
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांनी आपल्या समर्थकांसमोर आपला पराभव स्वीकारला. वॉशिंग्टनमधील हॉवर्ड विद्यापीठात भाषण देताना कमला हॅरिस म्हणाल्या की, या निवडणुकीचे निकाल आपण स्वीकारले पाहिजेत. आजच सुरुवातीला, मी राष्ट्राध्यक्ष-निर्वाचित ट्रम्प यांच्याशी बोलले आणि त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना असेही सांगितले की आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या टीमसोबत शांततेने सत्ता हस्तांतरण करू. Kamala Harris
2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून झालेला पराभव स्वीकारण्यास ट्रम्प यांनी नकार दिल्याचा उल्लेख न करता, हॅरिस म्हणाल्या की निवडणुकीच्या निकालांचा आदर करणे हे लोकशाहीला राजेशाही किंवा जुलूमशाहीपासून वेगळे करते. ज्याला सार्वजनिक विश्वास हवा आहे त्याने त्याचा आदर केला पाहिजे. तसेच, आपल्या देशात आपण कोणत्याही राष्ट्राध्यक्ष किंवा पक्षाशी नाही तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या राज्यघटनेशी आणि आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला आणि आपल्या देवाशी एकनिष्ठ आहोत. Kamala Harris
हॅरिस यांच्या भाषणादरम्यान त्यांचे समर्थक चांगलेच उत्साहित दिसत होते. हॅरिसने त्यांच्या समर्थकांना ट्रम्प यांच्या निर्णायक विजयाच्या निराशेनंतरही त्यांच्या कल्पनांसाठी लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
हॅरीस यांनी म्हटले की, या निवडणुकीचा निकाल तो नाही जो आम्हाला हवा होता. तो नाही, ज्यासाठी आम्ही लढलो. तो नाही ज्यासाठी आम्ही मत दिलं. परंतु जेव्हा मी म्हणते की, अमेरिकेचे भविष्य तोपर्यंत उज्ज्वल राहील, जोपर्यंत आपण हार नाही मानत आणि जोपर्यंत आपण लढत राहतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App