जाणून घ्या, पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
विशेष प्रतिनिधी
लाहोर : Yasin Maliks जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेएफएलएफ) प्रमुख आणि दहशतवादी यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिक यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात मलिक यांनी आपल्या तुरुंगात असलेल्या पतीचा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती केली आहे.Yasin Maliks
जम्मू-काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी तिचा पती महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा दावा मुशाल यांनी केला आहे. राहुल यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मलिकला त्याच्याविरुद्धच्या बनावट खटल्यांमध्ये फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
मानवी हक्क आणि महिला सबलीकरणाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सहाय्यक राहिलेल्या मुशाल यांनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात मलिक यांच्याविरोधात ३ दशक जुन्या देशद्रोहाच्या खटल्यात आपले लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एनआयएने या प्रकरणी अपील दाखल करून मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 2017 च्या या प्रकरणात एजन्सीने मलिकसह अनेक लोकांविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते.
2022 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुशालने पत्रात लिहिले आहे की, ‘तुरुंगातील अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ मलिक २ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणावर आहेत. या उपोषणाचा मलिक यांच्या प्रकृतीवर अधिक घातक परिणाम होणार आहे. यामुळे शस्त्र सोडून अहिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात येईल. भाजप सरकार 2019 पासून ‘सर्व अकल्पनीय मार्गांनी’ त्रास देत असल्याचा आरोप मुशाल यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App