विशेष प्रतिनिधी
अमरावती : Raj thackeray धर्मांध मुसलमानांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात मनसेने आवाज उठवला. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज दिला. ते बंद करून टाकले. हे केलं म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर 17000 केसेस टाकल्या. त्यावेळी सरकार उद्धव ठाकरे-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच होतं. माहीममध्ये एक मझार होती ती अनधिकृत होती, ती आम्ही पाडायला लावली. माझा आज तुम्हाला शब्द देतो, माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही”, असे आश्वासन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज दिले. Raj thackeray Give me a chance, not a single mosque will be allowed to be planted
अमरावती विधानसभेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी अमरावतीत झाली. त्यावेळी मशिदींवरच्या भोंग्यांविरुद्ध पुन्हा राजगर्जना झाली.
राज ठाकरे म्हणाले :
– आपण मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून कधी विचार करणार आहोत का नाही?? हिंदू फक्त दंगलीत एकत्र असतो बाकीच्या वेळेस तो हिंदू नसतो. आणि हेच बाहेरच्यांना हवं आहे. मी एक क्लिप पाहिली आज, एक मुसलमान मौलवी मशिदीतून फतवा काढतो की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकगठ्ठा मतदान करा असे फतवे निघत आहेत. लोकसभेला पण हेच घडलं. मग हिंदू का विखुरलेले आहेत??
– इम्तियाज जलीलने हजारो मुसलमानांचा मोर्चा मुंबईत आणला, ही हिंमत का झाली?? कारण काँग्रेस + शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ! उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आले. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस – राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती केल्यावर स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाच्या मागची ‘हिंदुहृदय’ सम्राट ही उपाधी काढली. नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी रस्त्यावर उतरून बीभत्स आंनद व्यक्त केला. मागे एकदा अमरावतीत दंगल झाली तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्व हिंदू परिषद यांनी दंगेखोर मुसलमानांना सडकून काढलं होतं. कितीवेळ बाहेर उभं राहून करायचं, माझ्या हाती सत्ता द्या, एकेकाला चांगला सडकून काढायला.
– अमरावतीला आलं की मला घरी आल्यासारखं वाटतं. 1989 साली प्रत्यक्ष राजकारणात आलो, जन्म राजकीय घरात झाला होता. पुढे राजकीय व्यंगचित्रकार झालो आणि 1989 साली विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला. 1993 साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढला होता. 1989 ते 1995 हा काळ माझा मराठवाडा आणि विदर्भात गेला. त्यातल्या त्यात विदर्भात सगळ्यात जास्त काळ अमरावतीत राहिलो. 1988-89 ला माझे मित्र विजय राऊत यांच्या घरी जात असे. तेव्हाच अमरावती सुंदर होतं. माझ्या आजीचं माहेर अमरावती. अमरावती बद्दल मला पहिल्यापासून एक आस्था आहे. पण आज हे शहर जसं आकारहीन होत गेलं ते पाहून वाईट वाटतं.
– हिंदू एकत्र येऊ नये म्हणून शरद पवार नामक संताने महाराष्ट्रात जातीजातीत विष पेरलं. जेम्स लेन प्रकरणात महाराजांच्याबद्दल काही वेडीवाकडी वाक्य होती, ते पुस्तक कोणी वाचलं होतं?? त्यावर बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहंदळे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या मजकुरावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पवारांनी भांडारकर संस्थेवर आरोप करवून घेतला की याच संस्थेनेच म्हणे ही चुकीची माहिती दिली. आणि पुढे बाबासाहेब पुरंदरेंवर आरोप करून शरद पवारांनी आधी ब्राह्मण – मराठा वाद भडकवला आणि पुढे मराठा – ओबीसी वाद पेटवला. तुम्ही मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून एकत्र येऊ नये ही पवारांची इच्छा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App