विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rahul Gandhi आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांची आता प्रचार सभा पार पडली सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते.Rahul Gandhi
सभेच्या सुरुवातीला मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी भाषण केले. यावेळी वर्षा गायकवाड यांनी महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य करत महायुती सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडीची सरकार पुन्हा येणार, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून लोकसभेचे पंचसूत्रे कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. महिलांना सुरक्षा, शेतकऱ्यांना न्याय, युवकांना न्याय अशा विविध विचारांवरच आपल्या सगळ्यांना गॅरंटी देण्यासाठी वचन देण्यासाठी आदरणीय नेते या ठिकाणी आले आहेत.
महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर
1. जातीनिहाय जनगणना – 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार. 2. कुटुंब रक्षण – 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा देणार. 3. महालक्ष्मी योजना – महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देणार 4. युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांना महिन्याला 4 हजार रुपये देणार. 5. शेतकऱ्यांना कर्जमाफी – नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी.
राहुल गांधींच्या भाषणातील ठळक मुद्दे
ही विचारधारेची लढाई आहे. एका बाजूला बीजेपी आरएसएस आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी. एका बाजूला आंबेडकरांचे संविधान एकता समानता मोहब्बत रिस्पेक्ट आणि दुसऱ्या बाजूला समोरून नव्हे तर लपून बीजेपी आणि आरएसएसचे लोक या संविधानाला संपवत आहेत. हे समोरून बोलणार नाहीत कारण संपूर्ण देश यांना संपवून टाकू शकतो म्हणून हे लपून या संविधानाला संपवण्याचा घाट घालत आहेत.
महाराष्ट्रात पूर्वीचे सरकार हे इंडिया आघाडीचे सरकार होते आणि त्या सरकारला चोरी करत पैसे देत हटवण्यात आले. का, कारण त्यांना दोन-तीन अरबपतींची मदत करायची आहे. मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहित आहे की धारावीची जमीन, तुमच्या हक्काची जमीन गरिबांची जमीन तुमच्या डोळ्यासमोर हिसकावली जात आहे.
महाराष्ट्रात येणारे जे प्रोजेक्ट होते तुमच्या पासून हिसकावून दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवले जात आहेत. पाच लाख युवकांना रोजगार मिळाला असता. हे सगळे प्रोजेक्ट गुजरातमध्ये पाठवण्यात आले. सेमी कण्डक्टर प्लांट, आयफोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, पेट्रोल केमिकल प्रोजेक्ट हे सगळे हे महाराष्ट्राचे होते त्यातून युवकांना रोजगार मिळणार होता हे सगळे तुमच्या पासून हिसकावण्यात आले.
राहुल गांधी म्हणाले, या संविधानामुळे अदानी अंबानी यांच्यावर मर्यादा आणता आल्या आहेत. या संविधानामध्ये महापुरुषांचे विचार आहेत, यात आंबेडकरांचा आवाज आहे, फुलेंचा आवाज आहे, गांधीजींचा आवाज आहे. हिंदुस्थानाचा आवाज गरिबांचा आवाज दलितांचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज या संविधानात आहे. संविधान हे केवळ पुस्तक नाही. इंडिया आघाडी तुम्हाला आश्वस्त करते की काहीही झाले तरी संविधानाला कोणी हात लावू शकत नाही याला कोणीच संपवू शकणार नाही. इंडिया आघाडी एकसाथ आहे आणि हिंदुस्थानाची जनता एकत्र आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App