विशेष प्रतिनिधी
अमरावती : Navneet Rana तुझ्या घड्याळीत 15 मिनिटे बाकी असतील, पण माझ्या घड्याळीत फक्त 15 सेकंद बाकी आहेत, असे थेट प्रत्युत्तर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसींच्या विधानावर दिले आहे. अमरावती येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आले आहेत. यावेळी नवनीत राणा यांनी हा हल्लाबोल केला आहे.Navneet Rana
मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी म्हणले होते की, “मेरी घडी मे पावणे दस हो रहे, अब सिर्फ 15 मिनिट बाकी है”. त्यांच्या या विधानावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी टीका केली आहे. अरे तू हैदराबादवरुन आला आणि सांगतो की माझ्या घड्याळात 15 मिनिट बाकी आहेत अरे माझ्या घडीत फक्त फक्त 15 सेकंद आहेत, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकांवेळी नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये जाऊन ओवैसींवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर, आता अमरावतीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासमोर भाषण करताना देखील अकबरुद्दीन ओवैसींना इशारा दिला आहे. यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर देखील टीका केली आहे. माझी नणंद बाई 3 टर्म पासून प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात, अशी टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले होते अकबरुद्दीन ओवैसी?
अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले, भारत हा देश हा जितका टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढी असणाऱ्या लोकांचाही आहे, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले. भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. भाजपची विचारधारा असणाऱ्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले.
पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हिंदुत्त्व शिकवण्यात यशस्वी झाले का? राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांना सेक्युलर शिकवण्यात यशस्वी झाले का? अजित पवारांनी आपल्या भ्रष्टाचाराचा अभ्यास मोदी आणि योगी यांना शिकवलं का? यांना फक्त सत्ता आणि सत्तेची गादी पाहिजे, असे म्हणत अकबरुद्दीन ओवैसी यांनी महायुती व महाविकास आघाडी दोघांवरही टीका केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App