विशेष प्रतिनिधी
चिंचवड : Devendra fadnavis लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीने भाजप बहुमताने आल्यास संविधान बदलतील, असा प्रचार केला होता. त्याचा मतांवर मोठा परिणाम झाला, तर आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या काळात अनेक उद्योग गुजरातला पळवले, असा फेक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीचे नेते चालवत आहेत. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील सभेत बोलताना त्यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. शरद पवार फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक, तर सुप्रिया सुळे डायरेक्टर आहेत, असे शरसंधान देवेंद्र फडणवीसांनी साधले. Devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
फेक नेरिटीव्हची फॅक्टरी सुरू झाली आहे. शरद पवार हे फेक नेरिटीव्ह फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागत आहेत. ते रोज सांगतायत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रात उद्योग येत नाही. पुणे जिल्हा, पिंपरी- चिंचवड हे औद्योगिक हब आहे. 52 % गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर आहेत. त्या म्हणाल्या हिंजवडी आयटी हबमधून कंपन्या स्थलांतरित झाल्या. Devendra fadnavis
Amit Shah : दहशतवादाविरोधातील उपाययोजनांवर दोन दिवस विचारमंथन सुरू राहणार
मी सांगतो फक्त 16 आयटी उद्योग हिंजवडी आयटी हबमधून बाहेर गेलेत मात्र ते महाराष्ट्रातच आहेत. त्यापैकी 13 उद्योग हे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात गेले. आमच्या महायुती सत्ताकाळात फक्त 3 उद्योगांनी स्थलांतर केले. मात्र सुप्रिया सुळे विनाकारण फेक नरेटिव्ह निर्माण करत आहेत. आमचं सरकार आल्यावर जुन्या सरकारचं सगळ्या योजना बंद करणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. Devendra fadnavis
चिंचवड मतदारसंघात सभा घेत असताना दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी आठवण येत आहे. त्यांनी एक वेगळी ओळख तयार केली. शहराच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कमी वयात आणि महत्वाच्या वेळी ते आपल्याला सोडून गेले. अश्विनी जगताप यांच्यावर चिंचवडच्या जनतेने विश्वास दाखवला. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. लक्ष्मण जगताप यांचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप आणि आश्विनी जगताप यांच्यावर ज्या प्रमाणे विश्वास दाखवला तोच शंकर जगताप यांच्यावर विश्वास दाखवतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App