Ajit pawar पवारांवरच्या वैयक्तिक टीकेनंतर अजितदादा सदाभाऊंवर भडकले, पण राऊत सदाभाऊंना कुत्रा म्हणाले, अजितदादा आता काय म्हणतील??


नाशिक : शरद पवारांवर वैयक्तिक टीका केल्यानंतर अजितदादा सदाभाऊ खोतांवर भडकले, पण संजय राऊत सदाभाऊंना कुत्रा म्हणाले. त्यावर अजितदादांनी अद्याप तरी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. Ajit pawar got angry at Sadabhau

शरद पवारांवर बोलताना सदाभाऊंची जीभ घसरली. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा मला बदलायचे शरद पवार म्हणाले होते. त्यांना स्वतःच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्राचा चेहरा विद्रूप करायचा आहे का??, असा असावा सदाभाऊंनी विचारला होता. सदाभाऊंची ही टीका अश्लाघ्यच होती. तिचे समर्थन करायचे काही कारणच नाही. त्यानंतर सदाभाऊंवर संपूर्ण महाराष्ट्रातून टीकेची राळ उठली. सदाभाऊ बॅक फूटवर गेले. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अजितदादांनी सदाभाऊंना फोन करून झापले. शरद पवारांवर वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. ती आम्ही आणि महाराष्ट्र खपवून घेणार नाही. इथून पुढे असे बोलू नये. वडीलधाऱ्या माणसांना बोललेले महाराष्ट्र खपवून घेत नाही, असे अजितदादांनी सदाभाऊंना सुनावले. सदाभाऊंना ते मुकाटपणे ऐकून घ्यावे लागले.

अजितदादांनी सदाभाऊंना सुनावताना यशवंतराव चव्हाणांसकट सगळ्या काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या सभ्यतेचा हवाला दिला. पण अजितदादा असा सभ्यतेचा हवाला देत असताना संजय राऊत सदाभाऊ खोतांना देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा म्हणाले. त्यावर अजितदादांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

याखेरीज आज जरी अजितदादांनी महाराष्ट्रातल्या सभ्येतेच्या राजकारणाचा हवाला देऊन सदाभाऊंना झापले असले तरी, 2019 मधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी खुद्द शरद पवारांनी तृतीयपंथीयांसारखे हातवारे करत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती, त्यावेळी अजितदादांना सभ्यतेचे राजकारण आठवले नव्हते. त्यावेळी शरद पवारांनी असे तृतीयपंथीयांसारखे हातवारे करून राजकारणाचा स्तर खाली आणल्याचे अजितदादा म्हणाले नव्हते.

– अजितदादांना बारामतीची भीती

खरंतर शरद पवारांची वरची वैयक्तिक टीका बारामतीत आपल्याला भोवेल, अशी साधार भीती अजितदादांना वाटली. शरद पवारांनी आधीच बारामती मध्ये इमोशनल कार्ड टाकून ठेवलेय. त्यामध्ये सदाभाऊंनी केलेल्या पवारांवरच्या वैयक्तिक टीकेची भर पडली, तर त्याचा फटका बारामती मतदारसंघात आपल्याला बसेल याची भीतीने अजितदादांच्या मनात घर केले. कारण असा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत किंवा लागला. त्यामुळे अजितदादा जास्त सावध झाले. त्यामुळेच त्यांनी डॅमेज कंट्रोल साठी सदाभाऊंना फोन करून झापले.

Ajit pawar got angry at Sadabhau khot

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात