विशेष प्रतिनिधी
मुंबई : चार दिवसांची दिवाळी संपली, अन् महाराष्ट्रातला प्रचार रंगात आला; कुत्रा आणि डुक्कर म्हणून राजकीय चिखलात लोळला.
याची सुरुवात सदाभाऊ खोतांनी केली. शरद पवारांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली मला महाराष्ट्राचा चेहरा मुरा बदलायचा आहे असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर टीका करताना सदाभाऊंनी पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्राचा चेहरा विद्रूप करायचाय काय??, असा सवाल विचारला होता. सदाभाऊंवर त्यामुळे सगळीकडून टीकेची झोड उठली. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी सदाभाऊंवर तुटून पडले. अजित पवारांना बारामतीची भीती वाटली. त्यामुळे ताबडतोब त्यांनी सदाभाऊंना फोन करून झापले. सदाभाऊंनी अजितदादांचे म्हणणे ऐकून घेतले आणि दिलगिरी व्यक्त केली.
मात्र, हा विषय पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तापवला. सदाभाऊ जेव्हा शरद पवारांवर असाभ्य भाषेत टीका करत होते तेव्हा देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवत होते त्यांनी त्याच क्षणी उठून सदाभाऊंना कानफाटात वाजवायला हवी होती, पण सदाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेला कुत्रा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Amit Shah : दहशतवादाविरोधातील उपाययोजनांवर दोन दिवस विचारमंथन सुरू राहणार
त्यावर सदाभाऊ पण भडकले. शरद पवारांच्या वरच्या टीकेनंतर सदाभाऊंनी दिलगिरी व्यक्त केली, पण संजय राऊत यांना त्यांनी सोडले नाही. संजय राऊतांना महाराष्ट्रातला गावगाडा माहिती नाही. तिथे राखणदार कुत्राच महत्वाचा असतो. संजय राऊत आणि त्यांचे मालक 2014 आणि 2019 मध्ये मोदींचे फोटो गळ्यात घालून फिरत होते. कुत्रा काही झालं तरी इमानदार असतो, त्याची थोडी तरी इमानदारी तुमच्यात असती, तरी तुम्ही महाराष्ट्राचे स्तुती केली असती. पण डुकराला कितीही साबण आणि शाम्पू लावला, तरी डुक्कर गटारीतच जायचं, असे शरसंधान सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर साधले.
अजित पवारांनी सदाभाऊ खोत यांना फोन करून झापताना त्यांना महाराष्ट्रातल्या यशवंतराव चव्हाण पासून सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सभ्यतेचा हवाला दिला होता. पण राऊत आणि खोत यांनी त्या सभ्यतेची पुरती वासलात लावत महाराष्ट्रातला प्रचार राजकीय चिखलात लोळवला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App