विशेष प्रतिनिधी
अमरावती : Navneet Rana भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील तिवसा विधानसभा मतदारसंघात भाषण करताना कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझी नणंद बाई 3 टर्म पासून प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात, अशा शब्दात नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.Navneet Rana
तिवस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश श्रीरामजी वानखेडे यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा बोलत होत्या. नवनीत राणा म्हणाल्या, नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात. बाकी कार्यकर्ते सतरंजी उचलतात. माझ्या नणंद बाईने जाती जातींमध्ये विभाजन करून मत घेतले आहेत. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचे काम नणंद बाई करत आहेत. एकही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. नणंद बाईने खूप कमावले आहे. तिकीट देणार म्हणून दर्यापूरच्या उमेदवारचे घर लुटले, असा आरोप देखील नवनीत राणा यांनी केला आहे.
पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाले, देवासमोर वाढलेले ताट खाण्याचे काम माझ्या नणंद बाईने केले आहे. दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम त्यांनी केले आहे. माझी नणंद बाई 3 टर्मपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात. नणंद बाईकडे खूप माल आहे. निवडणुकीसाठी शेत विकावे लागते म्हणते, कागदपत्रे दाखव कोणते शेत विकले? असा सवाल राणा यांनी उपस्थित केला आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, राहुल गांधींचे खटाखट पैसा आला का? महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहोत. तुम्ही तिजोऱ्या खाली केल्या स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी केल्या. आमचे सरकार गोरगरीब लोकांना मदत करत आहे. राहुल गांधी संविधान घेऊन फिरतात त्यांना विचारा संविधानात किती पाने आहेत? असा खोचक सवाल देखील नवनीत राणा यांनी विचारला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App