एकनाथ शिंदे : महाविकास आघाडी सरकारचा रडीचा डाव, माझ्याकडे शिवसेनेचे 40+ आणि अपक्ष 12 = 50+ आमदार!!


प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडी सरकार रडीचा डाव खेळत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्यामुळे ते धमक्या देत आहेत. परंतु आपल्याकडे शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आणि अपक्ष 12 असे 50 पेक्षा जास्त आमदार आहेत. कायदा आम्हालाही कळतो. त्यामुळे आम्ही कायद्याच्या लढाईत देखील पुढे जाऊ, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे.Shivsena splits : eknath shinde claims 40+ and independents 12 MLAs are with him in guwahati

गुवाहाटी मधील हॉटेल रेडिसन मध्ये शिंदे गटाच्या सर्व आमदारांची आणि अपक्ष आमदारांची बैठक होत आहे. यामध्ये पुढची रणनीती ठरवण्यात येईल. यापूर्वी प्रसार माध्यमांना शिंदे यांनी कालचा सर्व घटनाक्रमावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या बंडा मागे भाजप नाही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी माझा संपर्क झाला नाही असा दावा शिंदे यांनी केला आहे.त्यापूर्वी काल बंडखोर आमदारांना मुंबई जावेच लागेल तेव्हा बघू भाजपचे कोण त्यांच्या मदतीला येते अशी धमकी भरली भाषा शरद पवारांची वापरली होती. त्याच वेळी शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाच्या 12 आमदारांची आमदारकी रद्द करण्याचे पत्र शिवसेनेने विधानसभा उपसभापतींना दिले होते.

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवारांच्या धमक्‍यांना, शिवसेनेच्या निमंत्रणाला आणि 12 आमदारां आमदारकी रद्द करण्याच्या पत्राला आम्ही घाबरत नाही. कायदा आम्हालाही कळतो. मेजॉरिटी आमच्याकडे आहे. शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आणि अपक्ष 12 असे 50 पेक्षा जास्त आमदार सध्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये माझ्याबरोबर उपस्थित आहेत. पुढची रणनीती ठरवण्यासाठी आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेनंतर कायदेशीर लढाई ते विधिमंडळ लढाई पाहिजे सर्व बाबींचा खुलासा होईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे

Shivsena splits : eknath shinde claims 40+ and independents 12 MLAs are with him in guwahati

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात