शिवसेनेत फूट : सरकार वाचवण्यासाठी सर्वाधिक तगमग पवार आणि राष्ट्रवादीची; शिवसेना – काँग्रेसचे राष्ट्रवादीवर शरसंधान!!


प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मात्र या सरकारची अडचण सोडवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार वाचवण्यासाठी सध्या सर्वाधिक तगमग राष्ट्रवादीची सुरू आहे आणि शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. NCP desperate to save Thackeray government, but nana patole attackes NCP

शिवसेनेतल्या बंडखोरांना शरद पवारांनी इशारा दिला आहे. शिवसेनेचे बंडखोर जनतेतून परत कधी निवडून येत नाहीत, असा अनुभव आहे. हे बंडखोर आमदारांनी लक्षात घ्यावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत केले आहे.


द फोकस एक्सप्लेनर : बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या ताब्यात अख्खा पक्षच जाणार? जाणून घ्या, महत्त्वाचा नियम


– नाना पटोले यांची अजित दादांवर टीका

अजित पवार निधी देत नाहीत अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांची होती. तशीच तक्रार काँग्रेसच्या आमदारांची देखील आहे, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. एक प्रकारे नाना पटोले यांनी महा विकास आघाडी सरकारच्या अडचणीच्या काळात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या सुरात सूर मिसळला आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन करून काँग्रेस देखील सरकार वाचवण्यासाठी उत्सुक असल्याचे दाखवून दिले आहे.

– एकनाथ शिंदे गट झुकायला तयार नाही

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या समवेत असणारे 42 आमदार मात्र कोणत्याही स्थितीत महाविकास आघाडी सरकारपुढे झुकायला तयार नाही. संजय राऊत यांनी दिलेली ऑफर देखील एकनाथ शिंदे यांच्या गटाने फेटाळली आहे. नुसती ऑफर देऊ नका. प्रत्यक्षात महाविकास आघाडीतून आधी बाहेर पडा. राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंध तोडा मगच चर्चा करू, असा इशारा एकनाथ शिंदे यांच्या गटाने गुवाहाती मधून दिला आहे.

NCP desperate to save Thackeray government, but nana patole attackes NCP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात