वृत्तसंस्था
भोपाळ : उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. यानिमित्ताने अनेक तरुण तरुणी एकमेकांना प्रपोज करताना दिसतात. परंतु ही पाश्चिमात्य संस्कृती आपल्या देशावर लादली असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना अनेक वर्ष करत आल्या आहेत.Shiv Sena lati pujan to oppose Valentine’s Day
या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये शिवसेनेने व्हॅलेंटाईन डे निमित्त “मौजमस्ती” करणाऱ्या तरुण-तरुणींना धडा शिकवायचे ठरवले आहे. भोपाळमध्ये कोणतेही पार्क, रेस्टॉरंट येथे काही तरुण – तरुणी काही “वेगळे” करताना दिसल्या तर त्यांना लाठीने बडवण्याचे प्लॅनिंग शिवसैनिकांनी केले आहे.
आज कालिका शक्तिपीठाचे शिवसैनिकांनी लाठी पूजन केले. त्यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या. “कुछ करते दिखे बाबू – सोना, तोड देंगे शरीर का हर कोना कोना”, अशा या घोषणा होत्या. शिवसेने बरोबरच बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांचे कार्यकर्तेही व्हॅलेंटाईन डे च्या विरोधात असतात. परंतु ज्या वेळी शिवसेनेने व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यासाठी लाटी पूजन करून तरुण-तरुणींना लाठीने बडवण्याचा या पद्धतीची आघाडी घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App