बुलंद भारत की बुलंद तस्वीर “हमारा बजाज!!”


 

बुलंद भारत की बुलंद तस्वीर… “हमारा बजाज” 1980 च्या दशकात दूरदर्शनवर गाजलेली ही जाहिरात असली, तरी राहुल बजाज यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी ती मानचिन्ह ठरली…!!The lofty picture of lofty India “Our Bajaj

राहुल बजाज यांनी 1968 मध्ये जेव्हा “बजाज ऑटो” या मध्यम आकाराच्या कंपनीची सूत्रे घेतली, तेव्हा देशात “लायसन्स राज” लालफितीशाही यांचे राज्य होते. उद्योग क्षेत्रावरील बंधनांची सरकारी मूठ घट्ट होती खुली अर्थव्यवस्था तर सोडाच पण अर्थव्यवस्थेची कवाडे देखील उघडलेली नव्हती. छोट्यातला छोटा स्क्रू बनवायचा असला तरी सरकारी परवानग्यांच्या जंजाळात उद्योजकांना अडकवले जात होते.या काळात पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहरात “बजाज ऑटो”मध्ये राहुल बजाज यांनी पहिले पाऊल टाकले. त्यानंतर पहिल्यांदा कंपनीत आधुनिक व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न केले. कामगारांना मधली सुट्टी, त्यांच्यासाठी विशिष्ट मनोरंजनाची सोय, त्यांची मनोवृत्ती उल्हसित राहावी, यासाठी अनेक उपक्रम हे राहुल बजाज यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीचे वैशिष्ट्य ठरले. दुचाकी आणि तीन चाकी स्वयंचलित वाहने यांना भारतात “भविष्य” आहे, हे ओळखणारे ते पहिले उद्योजक ठरले…!!

त्या काळात तीन आकडी पगार असणाऱ्या नोकरदारांचे स्वप्न सायकलचे होते. किंबहुना सायकल हेच सर्वसामान्यांचे वाहन मानले जायचे. पगार तीन आकड्यावरून चार आकड्यांवर गेल्यानंतर सामान्यांचे स्वप्नही “मोठे” झाले, पण स्वप्नपूर्ती करणार कशी करणार? यावर प्रश्नचिन्ह कायम होते. मोपेड, स्कूटर सारखी स्वयंचलित वाहने मिळवणे हे दुरापास्त होते. मागणी होती पण उत्पादन नव्हते. त्यामुळे नंबर लावा. लायसन मिळवा. यासाठी हेलपाटे घालणे हा सामान्यांच्या जीवनाचा नित्यनियम भाग होता. स्कूटरसाठी नंबर लागायला अनेक वर्षे लागायची.

पण तरीदेखील राहुल बजाज यांनी जिद्दीने स्वयंचलित दुचाकी यांचे उत्पादन वाढवले. त्यासाठी प्रसंगी त्यावेळच्या सरकारशी भांडणही केले. औद्योगिक धोरणामध्ये बदल घडविण्यासाठी उद्योजकांच्या संघटनेचे नेतृत्व केले. सीआयआय आणि फिक्की यांचे अध्यक्षपद राहुल बजाज यांनी फार नंतर भूषविले. परंतु, उत्पादन क्षेत्रात उद्योजकांना मुभा मिळवून देण्यासाठी मात्र त्यांनी सरकारशी मोठा संघर्ष केला. सरकारला नवीन काळानुसार औद्योगिक धोरण बदलणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले.

त्यातून 1985 नंतर थोडा बदल झाला. अर्थव्यवस्थेची कवाडे थोडी खुली झाली. 1991 नंतर भारताची अर्थव्यवस्था खुली झाली. दुचाकी आणि तीन चाकी वाहन उत्पादन क्षेत्रात राहुल बजाज यांनी खऱ्या अर्थाने त्यानंतर झेप घेतली.

स्कूटर, ऑटो रिक्षा, पिकअप वाहने सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून दाखवली. नवीन मॉडेल बाजारात आणली. रिक्षा ही एकेकाळी मध्यमवर्गीयांसाठीही चैनीची गोष्ट होती. गरिबांसाठी तर ती दुरापास्तच होती. परंतु राहुल बजाज यांनी ऑटो रिक्शा उत्पादनात देखील मोठी झेप घेतली. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात ऑटो रिक्षा उपलब्ध केली. स्वयंचलित वाहने सर्वसामान्यांच्या दारात उभी करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते पूर्ण झाल्याचे भाग्य त्यांना आपल्या जीवनकालात लाभले…!!

The lofty picture of lofty India “Our Bajaj

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था