माढा – साताऱ्यात पवारांचे जुनेच डाव, मग इतर काय ठेवून बसलेत हातावर हात??, ते पण खेळतात की आपले डाव!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माढा – साताऱ्यात पवारांनी “डाव टाकले”, पवारांनी “चाणक्य खेळी” केली. बेरजेचे राजकारण केले, वगैरे बातम्यांची मराठी माध्यमांनी भरमार चालवली आहे. पण जणू काही माढा, साताऱ्यात एकटे पवारच डाव खेळत आहेत आणि बाकीचे हातावर हात ठेवून बसलेत, असे चित्र मराठी माध्यमांनी निर्माण केले असले तरी, तशी बिलकुल स्थिती नाही. उलट माढा आणि साताऱ्यात पवारांना जुनेच डाव खेळावे लागलेत, तर तिकडे पवारांचे विरोधक नव्या बेरजा करायला लागलेत. Sharad pawar playing old games in madha and satara, BJP playing bold games

पवारांना माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात आपल्या जुन्याच समर्थकांची जुळवाजवळ करावी लागली आहे. 2019 च्या निवडणुकीत पवारांपासून दूर गेलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे घराणे पवारांना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्याच घरातील धैर्यशील मोहिते पाटलांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी लागली आहे. कारण पवारांना माढा लोकसभा मतदारसंघात कुठला नवा चेहराच मिळू शकलेला नाही. प्रस्थापित मराठा सोडून इतर कुठल्याही समाज घटक पवारांच्या आसपासही फिरकायला तयार नाही म्हणून त्यांना विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातला उमेदवार द्यावा लागला.



जे माढा मतदारसंघात पवारांना करावे लागले, तीच साताऱ्यातली स्थिती झाली झाली. त्यापेक्षा साताऱ्यात पवारांना वेगळे काही करताच आले नाही. श्रीनिवास पाटलांनी वयाचे कारण पुढे करत लोकसभेची निवडणूक लढवायची नाकारल्यावर पवारांची पंचाईत झाली. पवारांना साताऱ्यात “सक्षम” उमेदवारच मिळेनासा झाला. शेवटी पवारांना कोरेगाव मधून पडलेले आमदार शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात लोकसभेची उमेदवारी घालावी लागली. आज शशिकांत शिंदे पवारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करून सातारा लोकसभा मतदारसंघात तुतारी चिन्हावर अर्ज भरणार आहेत. ज्या साताऱ्यात 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीमध्ये पवार पावसात भिजले, त्या लोकसभा मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीत पवारांकडे “सक्षम” उमेदवार सापडला नसल्याचे नसल्याची नामुष्की आली. पण मराठी माध्यमांमध्ये मात्र पवारांची चाणक्य खेळी पवारांनी डाव टाकला अशा “पवारनिष्ठ” बातम्या आल्या.

– मराठा + इतर समाज घटक

या पार्श्वभूमीवर पवारांचे विरोधक काही हातावर हात ठेवून बसलेले नाहीत. ते पण डाव टाकतच आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघात नाराज असलेल्या उत्तम जानकर यांना खास विमान पाठवून सागर बंगल्यावर बोलवून घेतले. तिथे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विधानसभा निवडणुकीच्या आश्वासन दिले आणि त्यांची अमित शाहांबरोबर भेट ठरवली. त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघातले सगळे वरिष्ठ नेते फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बोलवून घेतले होते. तिथे प्रस्थापित मराठा आणि बाकी सगळे समाज घटक यांची बेरीज करून निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित करण्यात आले.

राष्ट्रवादीने दुर्लक्षित केले, भाजपने जवळ केले

माढा, सातारा, बारामती, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांवर मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी वर्चस्व गाजवत असले, तरी प्रत्यक्षात मतदारसंघांमध्ये छोटे-मोठे सामाजिक घटक तितकेच महत्त्वाचे आहेत. किंबहुना संख्येच्या बळावर ते मराठा समाजापेक्षा अधिक आहेत. फक्त त्यांचे तेवढ्या संख्येच्या बळाच्या प्रमाणात प्रतिबिंब लोकप्रतिनिधीत्वात पडत नव्हते. याचा सरळ अर्थ असा की काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित राजकारणामध्ये बाकीच्या समाज घटकांना पुरेसे स्थान नव्हते. भाजपने प्रस्थापित मराठा समाजातले काही घटक आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांनी बाकीच्या समाजांमधले आत्तापर्यंत दुर्लक्षित ठेवलेले सर्व घटक यांच्या बेरजेचे राजकारण चालवले आहे. त्यामुळेच राम सातपुते सारखा नवखा उमेदवार भाजपने सोलापुरातून देण्याचे धाडस दाखवले आहे.

त्यामुळे पवारांनी कितीही “डाव टाकले”, “चाणक्य खेळ्या” केल्या, तरी प्रस्थापित मराठा समाजाच्या पलीकडे त्यांच्या खेळ्या गेलेल्या नाहीत. त्या उलट भाजपच्या मात्र प्रस्थापित मराठा आणि उर्वरित सर्व समाज घटक यांच्या बेरजेच्या राजकारणाच्या खेळ्या करत आहे, ज्या पवारनिष्ठ मराठी माध्यमांमध्ये प्रतिबिंबित झाल्या नसल्या, तरी प्रत्यक्ष जमिनी स्तरावर काम करताना दिसत आहेत.

Sharad pawar playing old games in madha and satara, BJP playing bold games

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात