Sharad Pawar : गुरुने दिला छुपा हा वसा; जरांगेंच्या तोंडी फक्त पाडण्याची भाषा!!

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी वारंवार मराठा आरक्षणाविषयीची भूमिका बदलली जरूर, पण त्यांनी टप्प्याटप्प्याने मजल दरमजल गाठत ज्यांना टार्गेट केले आहे, ते पाहता गुरुने दिला छुपा हा वसा, जरांगेंच्या तोंडी फक्त पाडण्याची भाषा!! असेच म्हणायची वेळ खुद्द जरांगे यांनीच आणून ठेपली आहे.

मनोज जरांगे यांनी आज घोंगडी बैठकीच्या निमित्ताने परळीत जोरदार भाषण केले. त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. फडणवीस, तुम्ही तुमच्या माणसांना आवरा, अन्यथा तुमचे 113 उमेदवार पाडू, अशी दमबाजी जरांगे यांनी केली. या दमबाजीत जरांगे यांच्या गुरुंनी दिलेल्या छुप्या वारशाचे इंगित दडले आहे.

मनोज जरांगे यांच्या तोंडी उमेदवार फक्त पाडण्याची भाषा आली. निवडून आणायची भाषा आली नाही. यातच सगळे आले. कारण मनोज जरांगे यांच्या छुप्या गुरुंच्या अख्ख्या राजकारणाचे तेच तर सार आहे. जरांगेंचे गुरु कुणाला निवडून आणण्यापेक्षा पाडण्यात जास्त माहीर. याचा “अनुभव” अनंतराव थोपटे, विलासराव देशमुख या मातब्बरांनी घेतला. आता तो “अनुभव” देवेंद्र फडणवीस यांना देण्याची गुरुंची इच्छा आहे. म्हणून मनोज जरांगे यांच्या तोंडी 113 पाडण्याची भाषा आली.


Kargil War : कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानची मोठी कबुली; लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने उडाली खळबळ!


मनोज जरांगे यांनी आतापर्यंत निवडणूक लढवायची भाषा अनेकदा वापरली. पण अंतिम निर्णय अजून घेतला नाही. निर्णय केव्हा घेणार??, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते समाजाला विचारून ठरवू, असे सांगत मनोज जरांगे निवडणूक लढायचा निर्णय घेणे पुढे ढकलत राहिलेत. जरांगे यांच्यावर विश्वास ठेवून विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या तब्बल 1000 जणांचे अर्ज जरांगे यांच्याकडे पडून आहेत. पण जरांगे त्यावर अद्याप निर्णय घ्यायला तयार नाहीत. जरांगेंची प्रत्यक्षात निवडणूक लढवायची तयारी देखील कुठे दिसलेली नाही. त्याऐवजी जरांगे यांनी 113 आमदार पाडायची भाषा वापरली. यातच गुरुने दिला छुपा हा वसा, जरांगेंच्या तोंडी फक्त पाडण्याची भाषा!!, याचे राजकीय रहस्य दडले आहे.

Sharad Pawar and manoj jarange destructive politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात