विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी तिसऱ्या आघाडीत यावे. त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी त्यांची भेट त्यासाठीच घेतली असल्याचे वक्तव्य माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी धाराशिव मध्ये केले. Manoj jarange + Sambhji Raje third front may support MVA after elections
सध्या सगळे प्रश्न बिकट आहेत. समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत तर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावे असे सांगून संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांना तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले.
संभाजीराजे म्हणाले, तसेच राज्य सरकारने दिलेले 10 % आरक्षण कोर्टात कसे टिकते याबाबत ही मला शंका आहे. एवढेच नाही माझ्या हातात राज्य आल्यानंतर मी आरक्षणाचा गुंता सोडवतो. मी छत्रपती शाहू महाराजांचा नातू आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे त्यांनी जसं आरक्षण दिलं होतं तसा देण्याचा प्रयत्न करू शकतो, असंही संभाजीराजे म्हणाले.
Kargil War : कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानची मोठी कबुली; लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
– बच्चू कडूंशी चर्चा
तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी काही आठवड्यांपूर्वी अंतरवाली येथे मनोज जरांगेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी प्रहारच्या बच्चू कडूंसोबतही चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर बच्चू कडू म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांच्यासमवेत माझी चर्चा झाली, मी एक कार्यकर्ता म्हणून संभाजीराजेंसोबत आहे. देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एक सैनिक म्हणून आम्ही महाराजांसोबत आहोत, असे म्हणत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करुनही त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही.
या सगळ्या घडामोडीमुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या समीकरणांबरोबर नंतरच्या देखील समीकरणांची चर्चा सुरू झाली. तिसरी आघाडी महायुतीची आणि महाविकास आघाडीची मते खाणार पण जे काही आमदार निवडून येणार, ते नंतर महाविकास आघाडीची सत्ता भरती करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आतापासूनच सुरू झाली आहे.
– लोकसभेसाठी काँग्रेसचा प्रचार
कोल्हापूरातून शाहू महाराजांनी काँग्रेसचे तिकीट घेऊन लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हा संभाजीराजे यांनी त्यांचा प्रचार केला. शाहू महाराज काँग्रेसचे खासदार झाले. त्यावेळी संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना, तिसरी आघाडी ही नावे देखील उच्चारली नाहीत. पण विधानसभा निवडणुका आल्याबरोबर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना, तिसरी आघाडी वगैरे गोष्टी करायला सुरुवात केली. त्यातच त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे यांना पटवून तिसऱ्या आघाडीत घेण्याचा प्रयत्न चालविला. त्यामुळे निवडणुकीनंतर ही तिसरी आघाडी महायुतीच्याच विरोधात जाऊन महाविकास आघाडीला मदत करणार याविषयी राजकीय वर्तुळात खात्रीपूर्वक चर्चा व्हायला लागली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App