Kargil War नेहमीच भारताविरुद्ध कट रचत आला आहे, अन् त्याचा खरा चेहरा वेळोवळी जगासमोरही आलेला आहे. Kargil War
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 1999 च्या कारगिल युद्धात Kargil War पाकिस्तानच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. आता कारगिल युद्धात आमचे अनेक सैनिक मारले गेल्याचे पाकिस्तानने जाहीरपणे मान्य केले आहे. 1965, 1971 आणि 1999 मध्ये कारगिल युद्ध लढताना आमचे अनेक जवान शहीद झाले, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी सांगितले आहे .
Ravikant Tupkar : प्रकृती खालावूनही रविकांत तूपकर उपाेषणावर ठाम
पाकिस्तानच्या संरक्षण दिनानिमित्त रावळपिंडीत आयोजित एका कार्यक्रमात लष्करप्रमुख मुनीर म्हणाले की, 1948, 1965, 1971 किंवा 1999 चे युद्ध असो, पाकिस्तानी सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत.
आपल्या सैनिकांची भूमिका स्वीकारून पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी हे सिद्ध केले की, पाकिस्तान नेहमीच भारताविरुद्ध कट रचत आला आहे. पाकिस्तानने कधीच कोणतेही गैरकृत्य केले नाही, असे जरी म्हटले असले तरी त्यांचा खोटारडेपणा जगासमोर नेहमीच दिसून येत आहे.
1999 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, या काळात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान शरीफ यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. कारगिल युद्धात Kargil War आपल्या सैनिकांनी भाग घेतला होता हे शरीफ यांनी मान्य केले नाही. पाकिस्ताननेही आपल्या सैनिकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more