Tuhin Kant Pande ते सध्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तुहिन कांत पांडे यांची नवे अर्थ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तुहिन कांत पांडे हे देशातील सर्वोत्तम अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. तसं पाहिले तर ते सध्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत. याआधी तुहिन कांत पांडे हे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव होते. Tuhin Kant Pande
तुहिन कांत पांडे हे 1987 च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे IAS अधिकारी आहेत. एअर इंडियाचे खासगीकरण आणि LIC च्या देशातील सर्वात मोठ्या IPO मध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी त्यांची ओळख आहे. तुहिन कांता पांडे, यांनी 2019 मध्ये गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) च्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली. वित्त मंत्रालयात रुजू होण्यापूर्वी, पांडे यांनी ओडिशामध्ये राज्य सरकारचे प्रधान सचिव म्हणून काम केले, ते त्यांचे गृह केडर होते.
Vinesh Phogat-Bajrang Punia : विनेश फोगाट-बजरंग पुनियाचा आज काँग्रेस प्रवेश; जुलानामधून विनेशचे तिकीट निश्चित; बजरंगला प्रचाराची जबाबदारी
पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि युनायटेड किंगडममधून एमबीएची पदवी घेतली आहे. त्यांनी ओडिशा आणि केंद्रीय स्तरावर विविध पदांवर काम केले आहे. ओडिशामध्ये, त्यांनी ओडिशा स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन (OSFC) मध्ये कार्यकारी संचालक आणि ओडिशा लघु उद्योग महामंडळ (OSIC) मध्ये व्यवस्थापकीय संचालक अशी पदे भूषवली. याव्यतिरिक्त, त्यांनी संबलपूर जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more