प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या सामन्यात देवेंद्रे फडणवीसच “मॅन ऑफ द मॅच” ठरले असून त्यांनी शरद पवारांसारखे दिग्गज समोर असताना महाविकास आघाडीला आस्मान दाखविले आहे.Rajya Sabha elections: The game was played at night; Sanjay from Kolhapur went home; BJP’s Dhananjay Mahadik wins with more votes than Sanjay Raut
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मते असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरली आहे.
‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असे ट्विट देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर केले आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणीसांनी महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज समोर असतानाही अचूक स्ट्रॅटेजी आखली आणि विजय खेचून आणला.
देवेंद्र फडणवीस या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, भाजपचे तीनही उमेदवार निवडून आल्याने आनंदाचा क्षण आहे. हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. राज्यातील लोकांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बहुमत दिले होते. हे आमदारांनीही आज दाखवून दिले.
धनंजय महाडिकांना संजय राऊतांपेक्षा जास्त मते
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनंजय महाडिक यांनी 41.5 मते मिळाली तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना 41 मते मिळाली. जे मत बाद झाले, ते मत ग्राह्य धरले असते, किंवा नवाब मलिकांना मताचा अधिकार दिला असता तरी आमचा उमेदवार निवडून आला असता. यामध्ये ज्या अपक्षांनी आम्हाला मतं दिली त्यांचे आभार. जे स्वत:ला महाराष्ट्र समजतात, त्यांना या विजयाने लक्षात आलं असेल की ही जनता म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई आहेत. ही विजयाची मालिका सुरू झाली आहे ती आता कायम सुरू राहील.
जिस कुशलता के साथ पूरी पार्टी एकजुट होकर लगी थी उन्होंने दिखा दिया कि भाजपा को ही प्रदेश में लोगों ने चुना था। फिर एक बार जनता को मौका मिलेगा और जनता भाजपा के साथ खड़ी है: केंद्रीय मंत्री और महाराष्ट्र से भाजपा के राज्यसभा उम्मीदवार पीयूष गोयल pic.twitter.com/vOf2hnAVVT — ANI_HindiNews (@AHindinews) June 11, 2022
जिस कुशलता के साथ पूरी पार्टी एकजुट होकर लगी थी उन्होंने दिखा दिया कि भाजपा को ही प्रदेश में लोगों ने चुना था। फिर एक बार जनता को मौका मिलेगा और जनता भाजपा के साथ खड़ी है: केंद्रीय मंत्री और महाराष्ट्र से भाजपा के राज्यसभा उम्मीदवार पीयूष गोयल pic.twitter.com/vOf2hnAVVT
— ANI_HindiNews (@AHindinews) June 11, 2022
चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाची भेट
हा विजय म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाची भेट असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकीकडे मतमोजणी सुरू असताना, टेन्शन वाढलं असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मात्र चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस साजरा केला.
देवेंद्र फडणवीसांचे करेक्ट प्लॅनिंग
धनंजय महाडिकांच्या विजयानंतर भाजपच्या गोटात सेलिब्रेशन सुरू आहे. सकाळी 9 वाजता मतदान सुरु झालं तेव्हापासूनच भाजपमध्ये मोठा विश्वास होता. विजयी खासदार अनिल बोंडेंनी तर निकाल वर्तवलाही होता. पण तेव्हा देखील महाविकास आघाडीनं आपलाच विजय होणार असा दावा केला. हे सगळं सुरु असतानाच भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस मात्र मतदान प्रक्रियेत बिझी होते. एक-एक मत कसं आपल्या बाजूने पडेल याकडेच त्यांचे लक्ष होते. आजारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोन आमदार मतदानासाठी आले, तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे स्वागत केले आणि याच मेहनतीला मध्यरात्री 3.30 नंतर यश आले.
महाविकास आघाडीची 10 मते फुटली
सगळ्यात धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीची 10 मते फुटली आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला. महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शन केले. 4 उमेदवार जिंकणार असे दावे केले. पण देवेंद्र फडणवीसांनी पडद्याआड राहुन निवडणुकीचं प्लॅनिंग केले. मतदानाच्या काही तास आधी आमदारांना विश्वासही दिला आणि तोच विश्वास निकालानंतर खरा ठरला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App