विशेष प्रतिनिधी
पुणे : टेलिव्हिजन विश्वातला प्रसिद्ध चेहरा दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य हे बिग बॉस फेम कपल समाज माध्यमात चांगलंच सक्रिय असतं. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी समाज माध्यमातून शेअर करत चाहत्यांच्या ते कायम संपर्कात असतात . समाज माध्यमांवरील हे लोकप्रिय कपल नुकतच आई-बाबा झाला आहे. त्यांच्या आयुष्यातल्या या सुंदर आणि नव्या कोऱ्या नात्याची सुरुवात गणेश चतुर्थीच्या दिवशी झाली. या दिवशी या दोघांच्या आयुष्यात लक्ष्मीने प्रवेश केला. त्यांच्या घरी सोन पावलाने छोटी चिमुरडी आली. Rahul Vaidya Disha Parmar shared happiness!
ईशान एका छान छोट्या मुलीला जन्म दिला आहे. आणि ही बातमी राहुलनं आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.
पोस्ट शेअर करताना, राहुल म्हणतो आमच्या घरी छोट्या लक्ष्मीचा आगमन झाले असून आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहे काळजी करायचं कारण नाही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्या चिमुरडीला नक्की द्या.
दिशा परमार आणि राहुल वैद्य यांची प्रेम कहाणी एका कमेंट पासून सुरू झाली. राहुलच्या एका गाण्यावर दिशा परमार येणे सुंदर कमेंट केली ती कमेंट राहुल आवडली त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री आणि प्रेम निर्माण झालं. बिग बॉस या कार्यक्रमात राहुलने दिशा ला प्रपोज केलं. आणि कार्यक्रमातून बाहेर आल्यावर दोघांनीही लग्न गाठ बांधली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more