भारत-चीन सीमा वादावर बोलताना राजनाथ सिंह यांनी अधीर रंजन चौधरींना दिले प्रत्युत्तर, म्हणाले…


जाणून घ्या, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी राजनाथ सिंह यांना उद्देशून म्हटले होते?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील संबंध प्रदीर्घ काळापासून तणावाचे आहेत. सीमेच्या मुद्द्यांमुळे दोन्ही देशांमध्ये अजूनही वाद सुरूच आहे. चीनच्या मुद्द्यावरून देशांतर्गत राजकारण वेळोवेळी तापल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसने गुरुवारी पुन्हा हा मुद्दा संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उत्तरानंतर काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावर मौन बाळगले. Speaking on India China border dispute Rajnath Singh replied to Adhir Ranjan Chaudhary

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत केंद्र सरकारच्या कामगिरीचे कौतुक करत होते. चांद्रयान-३ चे यश आणि जगात भारताचा सन्मान याचा उल्लेख त्यांनी केला. यादरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी राजनाथ सिंह यांना चीनच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता संरक्षणमंत्र्यांनीही लगेच उत्तर दिले.

लोकसभेत चीनच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची त्यांच्यात (राजनाथ सिंह) हिंमत आहे का, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला. यावर संरक्षणमंत्र्यांनी उत्तर दिले, ‘पूर्ण हिंमत आहे. चीनवरही चर्चा करण्यास मी तयार आहे आणि निर्भिडपणे चर्चा करण्यास तयार आहे.

आपल्या भाषणात राजनाथ सिंह म्हणाले, ‘आमच्या सरकारकडून अनेक कामे केली जात आहेत, जे आपल्या संस्कृती आणि परंपरेशी संबंधित गोष्टी सुलभ आणि जोडण्याचे काम करत आहेत.’ तसेच त्यांनी हे देखील म्हटले की,  मी समजू शकतो की सर्व सदस्य देशाच्या विकासासाठी विविध प्रकारच्या सुरक्षेबाबत जागरूक असतील.

Speaking on India China border dispute Rajnath Singh replied to Adhir Ranjan Chaudhary

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात