प्रतिनिधी
पुणे : कार्यकर्त्यांनीच पोस्टरवर चढवलेले मुख्यमंत्री अखेर खाली आणले आणि गणपतीच्या देखाव्यात शपथ देऊन मोकळे केले!!, असे खरंच घडले आहे. Activists brought down the Chief Minister on the poster
पुण्यातल्या नांदेड सिटी मध्ये राहणारे अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाबा पाटील यांनी गणपतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेचा देखावा सादर केला आहे. त्यासाठी त्यांनी छोटेखानी राजभवनच उभारले आहे. अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि त्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज ठाकरे यांच्या पर्यंत सर्व राजकीय पक्षांचे नेते पहिल्या रांगेत बाबा पाटलांनी “हजर” ठेवले आहेत.
यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना पहिल्या रांगेत “स्थान” दिले आहे, तर त्यांच्या मागे सुपरस्टार अमिताभ बच्चन, रजनीकांत, सचिन पिळगावकर, अशोक सराफ आदी अभिनेत्यांनी “बसविले” आहे. या सर्वांना बाबा पाटलांनी स्टेजवर मानाच्या खुर्च्यांवर “बसविले” आहे. या सर्वांच्या साक्षीने अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचा हा देखावा आहे.
सर्वच पक्षांचे कार्यकर्ते उत्साहात आपापल्या नेत्यांची मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स लावत असतात, पण जे 145 चा आकडा गाठतात तेच मुख्यमंत्री होतात. देवेंद्र फडणवीस यांनी तो आकडा गाठला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनीही तो आकडा गाठला, त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले, असे अजित पवारांनी अनेकदा बोलून दाखविले. पण त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काही फरक पडला नाही. अजितदादांना पोस्टरवरचे मुख्यमंत्री बनवून झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना खाली आणले आणि गणपतीच्या देखाव्यात का होईना, पण मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन मोकळे केले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App