विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात गणेशोत्सवा सोबतच येणारा सगळ्यात मोठा सण म्हणजे गौराईचा सण. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने परिचित असलेला हा सण म्हणजेच आदिमाया आदिशक्ती महालक्ष्मी चा उत्सव आहे. कुठे गणरायाची बहीण म्हणून कुठे घेणार आहे याची आई म्हणून तर कुठे गणरायाची बायको म्हणून विराजमान होणारी ही गौराई आपल्या भक्तांकडून लाडका पाहुणचार करून घेते. तीन दिवस माहेरवाशीन असलेल्या या गौराईचा घरातील लेखी सुना थाटामाटात पाहुणचार करतात. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं घराघरात वाजत गाजत आगमन होतं . आणि तिची स्थापना केल्या जाते . Shri Mahalaxmi Utsav news
गणपती बाप्पा घरी विराजमान झाले की, पाठोपाठ गौराई शंकरोबा, गंगा गौरीचे घरी आगमन होते. पश्चिम महाराष्ट्रात गौराई पती शंकर महादेवांसोबत येते. तर विदर्भात ती महालक्ष्मी म्हणून बहिणीसोबत येते. राज्यभरात गौराईंचे महत्त्व आणि त्या उभ्या करण्याच्या परंपरा काय आहेत हे पाहुयात.
सुगडाच्या गौरीविशेषतः देशस्थ ब्राह्मण घरात सुगडाच्या गौरी असतात. त्यातली एक गौर श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी च बसलेली असते. इतर सर्व घरात आजच दोन्ही गौरी येतात. गौरीचा उल्लेख बोलीभाषेत गौर किंवा गवर असा होतो. कराड साताऱ्यात गंगा गौरकराड सातारा भागात साधारण अशीच पद्धत पण तुळजापूर सोलापूर भागापासून पुढे अगदी पार विदर्भापर्यंत यांना महालक्ष्मी म्हणतात. इथं त्या गणेशाची माता शिवपत्नी नसतात तर विष्णू पत्नी लक्ष्मी आणि तीची जेष्ठ म्हणजे थोरली बहीण अलक्ष्मी मानतात. इकडे त्यांचे पिढ्यानपिढ्या सांभाळलेले मुखवटे असतात.
अलक्ष्मी खरंतर अमंगला पण या दिवसात तिचं पूजन करतात. अशा या दोघी बहिणींसोबत त्यांची बाळं पण बसवली जातात. जेष्ठा नक्षत्रावरच त्यांच पूजन आणि मुख्य सोहळा म्हणजे सवाष्ण भोजन.गौरी-शंकरोबा कोल्हापुरात गौराई पतिदेव महादेवांसोबत येते. पहिल्या दिवशी लेकीच म्हणजे गौराईचे आगमन होते तर दुसऱ्या दिवशी शंकरोबा येतात. शकरोबांना खास वाघाच्या कातड्यासारखे दिसणाऱ्या कपड्यात नटवतात.
तेरड्याची गौरकोकणातही तेरड्याची गौर येते. आज गौरा आली संध्याकाळ होईल तशी तिला नटवायची घाई होते. मग परंपरेने चालत आलेल्या पद्धतीनं नवे साज चढवून गौराई नटून उभी राहते आणि तिला बघून आयाबायांचा जीव सुखावतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App