श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शन फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींच्या मराठीतून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाचा फोटो शेअर करत पंतप्रधानांनी मराठीतून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.Happy Ganesh Chaturthi in Marathi by Shrimant Dagdusheth sharing Ganpati Darshan photo of Prime Minister Modi!!

पंतप्रधान मोदी 1 ऑगस्ट 2023 रोजी पुण्यामध्ये लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते. त्या दिवशी पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा आणि आरती केली होती. त्या प्रसंगाचा फोटो मोदींनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना शेअर केला आहे.

 

आजच्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संस्थेच्या कामकाजालाही आरंभ होणार आहे. त्याची जोरदार तयारी नवीन संसद भवनात सुरू आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात क्रांतिकारी निर्णय होतील, असे सूचक उद्गार पंतप्रधान मोदींनी काल सकाळी काढले होते. सायंकाळी कॅबिनेटच्या बैठकीत त्यांनी 33 % महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आज हे विधेयक लोकसभेत सादर होण्याची शक्यता आहे.

या खेरीज पाच नवे केंद्रशासित प्रदेश बनविण्याची क्रांतिकारक घोषणा मोदी सरकार करण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील काही भागाचा आणि तामिळनाडूतील काही भागाचा समावेश असण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोदी सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

Happy Ganesh Chaturthi in Marathi by Shrimant Dagdusheth sharing Ganpati Darshan photo of Prime Minister Modi!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात