विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Mahajan फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट फलटण पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे. मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.Prakash Mahajan
फलटण प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत मृत महिला डॉक्टरचे चॅट समोर आणले होते. यावरून प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, रुपाली चाकणकर यांनी त्या मृत महिलेचे चारित्र्यहनन केले आहे. ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. एवढे होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला.Prakash Mahajan
जयकुमार गोरेंसारख्या लोकांनी बाहेरून रोग आणला
मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील मृत महिलेच्या चारित्र्यावर बोट ठेवले होते. यावर प्रकाश महाजन म्हणाले, जयकुमार गोरे यांनीही मृत महिलेच्या चॅटिंगवर भाष्य करत तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे यांचे लोकांनी काय काय दाखवले नाही? ज्या महिलेला एक कोटी रुपये देताना ट्रॅप करण्यात आले ते एक कोटी गोरेंकडे कसे आले हे ईडीने त्यांना विचारले. त्यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार. हे कोणीही मुळ भाजपचे नाहीत, ते बाहेरून आले आहेत, त्यांनी बाहेरून येताना हा रोग आणला, अशी खोचक टीका महाजन यांनी केली आहे. तसेच राज्याचा एक मंत्री असे कसे काय बोलू शकतो? समजा त्या महिलेची चॅटिंग असेल तर तुम्ही काय तिला आत्महत्या करायला लावणार का? असा संतप्त सवालही महाजन यांनी उपस्थित केला आहे.
पाशा पटेल उपटसुंभ
प्रकाश महाजन यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार कोण यावर बोलणारे पाशा पटेल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाजन यांनी पाशा पटेल यांना ‘उपटसुंभ’ संबोधत, त्यांच्यावर मतलबी आणि संधीसाधू असल्याचा आरोप केला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर, जेव्हा पार्थिव परळीत आणले गेले, तेव्हा धनंजय मुंडे यांनी अंत्यसंस्कार करावेत असे म्हणणारा पाशा पटेलच होता, अशी आठवण महाजन यांनी करून दिली. त्यांनी प्रश्न विचारला की, गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल धनंजय मुंडे यांनी केलेले वक्तव्य पाशा पटेल यांना माहिती नाही का? त्यामुळे धनंजय मुंडे हे मुंडे साहेबांचे वारसदार होऊ शकत नाहीत. प्रकाश महाजन यांनी ठामपणे सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार ठरवण्याचा हक्क त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या ओबीसी वर्गाला आहे आणि त्यांचा खरा वारसा फक्त पंकजा मुंडेच आहेत, दुसरे कोणी नाही.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट फलटण पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे. मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.
फलटण प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत मृत महिला डॉक्टरचे चॅट समोर आणले होते. यावरून प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, रुपाली चाकणकर यांनी त्या मृत महिलेचे चारित्र्यहनन केले आहे. ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. एवढे होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App