आमच्या रक्तात महापुरुषांच्या विचारांच्या ऐवजी जातच भरली जातेय; राज ठाकरेंचा इशारा!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : आमच्या रक्तात अजून महापुरुषांचे विचार भिनायचे आहेत. पण ते भिनवण्याऐवजी आमच्या रक्तात जातच भरली जातच आहे, असा गंभीर इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज दिला Our blood is filled with caste instead of the thoughts of great men; Raj Thackeray’s Warning!!

अयोध्येतील वादग्रस्त ढाचा असलेली बाबरी मशीद पाडल्यानंतर तिची वीट राज ठाकरे घेऊन पुण्यात आले. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाला भेट देऊन 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आणि बाबरी मशिदीची वीट इतिहास मंडळाकडे सोपवली. ही वीट काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना दिली होती. बाळ नांदगावकर 1992 मध्ये बाबरी मशीद पडली त्यावेळी अयोध्येला गेले होते. कारसेवक म्हणून बाळ नांदगावकर गेले होते. त्यांनी येताना मशिदीची वीट आपल्यासोबत आणली होती. ती वीट त्यांनी राज ठाकरे यांना नुकतीच दिली. राज ठाकरे ही वीट घेऊन पुण्यात आले.



कोणाला दिली वीट

पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात राज ठाकरे आले. यावेळी त्यांनी शिवकालीन पत्राची पाहणी केली. त्यानंतर इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची ती वीट दिली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही आमच्याकडे महापुरुषांना जातीत पाहतो. त्यावरुन राजकारण केले जाते. हजारो वर्षांचा इतिहास खास करुन महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा इतिहास नक्की वाचला पाहिजे. हा इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं ? हे शिकायला मिळाला पाहिजे. त्यामुळे तो वाचला पाहिजे. इतिहासावर संशोधन करणारी ही संस्था आहे. या संस्थेसाठी मला काहीतरी कारवासे वाटते. यामुळे आज मी संस्थेला २५ लाख रुपये देत आहे.

ब्रिटनमध्ये पुतळे का नाही

ब्रिटनमध्ये पुतळे का नाही? उदाहरण सांगतात राज ठाकरे म्हणाले, आमचा इतिहास जाती पातीतून सुरू होतो. आमचे महापुरुष जातीत विभागले गेले आहेत. ब्रिटनमध्ये पुतळे का नाही? कारण तिथले लोक म्हणतात, आमच्या रक्तात महापुरुष आहे. पण आमच्या इकडे महापुरुष असून रक्त भिनायचे आहेत त्यांच्या ऐवजी आमच्या रक्तात जातच भरली जाते.

का दिली ती वीट??

बाळा नांदगावकर यांनी आणली ही वीट मी पाहिली. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा ते ही वीट घेवून आले होते. ती वीट पाहा, त्याचे वजन पाहा. एक हातोडा पडला आणि बाबरी पाडली, असे झाले नाही. कारण त्यावेळी स्ट्रक्चर चांगला होते. कारण त्यावेळी टेंडर निघत नव्हती. ती वीट मी माझ्या घरात ठेऊन काय करणार?? किंवा बाळ नांदगावकर त्यांच्याकडे ठेऊन काय करणार?? आज ती वीट इतिहास संशोधक मंडळाला देण्यासाठी मी आलो आहे. त्या विटेवर संशोधन होणे गरजेचे आहे. ती वीट चांगल्या संस्थेच्या हातात जावी, हा माझा हेतू आहे. त्यासाठी मी आलो आहे.

Our blood is filled with caste instead of the thoughts of great men; Raj Thackeray’s Warning!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात