नोकरदारांसाठी PF च्या व्याजदारात मोठी वाढ; 2023-24 साठी 8.25 % दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी आनंदाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे यंदा नोकरदारांना मागील 3 वर्षांतील सर्वाधिक व्याजदर मिळणार आहे.increase in interest rate of PF for employees



ईपीएफओने सन 2023-24 साठीच्या पीएफ ठेवींवर 8.25 % व्याजाची घोषणा केली आहे. मागील वर्षी 28 मार्च रोजी ईपीएफओने सन 2022-23 साठी 8.15 % दर जाहीर केला होता. 2021-22 रोजी हाच दर 8.10 % इतका होता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा पगारार कर्मचाऱ्यांसाठीचं अनिवार्य योगदान आहे. याव्यतिरिक्त, नोकरी देणाऱ्या कंपन्यांकडूनही ईपीएफ खात्यात संबंधित योगदान देणे आवश्यक आहे. सरकारी सेवानिवृत्ती निधी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या ईपीएफओचे एकूण 6 कोटींहून अधझिक सदस्य आहेत. दर महिन्याला, कर्मचारी त्यांच्या कमाईच्या 12 % रक्कम त्यांच्याच नावाने असलेल्या EPF खात्यात योगदान म्हणून देतात. नोकरी देणाऱ्या कंपन्या केवळ 3.67 % ईपीएफ खात्यात जमा करतात, उर्वरित 8.33 % रक्कम कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मधून वाटप केले जाते.

increase in interest rate of PF for employees

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात