मनोज जरांगेंच्या मागे नेमके कोण, हे लवकरच बाहेर येईल; राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य

प्रतिनिधी

ठाणे : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या मागे नेमके कोण आहे, महाराष्ट्रात जातीय तणाव कोण वाढवतो आहे, हे लवकरच बाहेर येईल, असे सूचक वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत केले आहे. Who exactly is behind Manoj Jarang?

राज ठाकरे म्हणाले की, मी मनोज जरांगे यांना भेटून सांगितले होते की, जातीवर आधारित असे कोणतेच आरक्षण कधीही मिळणार नाही. पण मूळात त्यांच्या मागे कोण आहे, त्यांना तसे बोलायला कोण सांगत आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव कोण वाढवतो आहे, हे लवकरच बाहेर येईल, असे सूचक उद्गार राज ठाकरे यांनी काढले.

जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे हे महाराष्ट्रात पूर्वी होतेच, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय, माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा, मी जातपात मानत नाही, माणसाला महत्त्व देतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

भाजपवर टीका 

मध्य प्रदेशमध्ये भाजपने मतदारांना मोफत आयोध्यावारी घडवण्याचे अश्वासन दिले. त्यावरुन राज ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाचे नवीन खाते उघडणार आहेत असे वाटतेय, इतके वर्ष जे काम केले त्यावर निवडणुका लढवायला हव्यात.

मराठी पाट्यांसाठी पुन्हा आंदोलन 

हवा आणि ध्वनिप्रदूषणामुळे न्यायालयाने दिवाळीत फटाके वाजण्यासंदर्भात निर्देश दिले त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आता फटाके कधी वाजवायचे, सण कसे साजरे करायचे हे पण न्यायालय ठरवणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मराठी पाट्या संदर्भात आम्ही मुद्दा घेतला तेव्हा व्यापारी न्यायालयात गेले, हे जातात कसे ? पण सरकारमधून काही हालचाली होत नाही. कदाचित आम्हालाच हात पाय हलवावे लागतील, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला.

Who exactly is behind Manoj Jarang?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात