शरद पवार गटाचे जुनेच युक्तिवाद; निवडणूक आयोगाकडून वकिलांची कानउघाडणी!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस मधील शरद पवार विरुद्ध अजित पवार संघर्षात शरद पवार गटाने निवडणूक आयोगात जुनेच युक्तिवाद केले. त्यामुळे निवडणूक आयोगातल्या अधिकाऱ्यांनी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांची चांगलीच कानउघडणी केली.
Old arguments of Sharad Pawar group Lawyers open their ears from the Election Commission

अजित पवार गटाने केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्रे जमा केल्याचा दावा शरद पवार गटाने केला होता. शरद पवार गट सातत्याने तेच तेच मुद्दे मांडतो आहे. ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला.

निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाबाबतची आज सुनावणी संपली. आता २४ नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे.सुनावणीला उशिरा सुरुवात

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी 50 मिनिटे उशिरा पोहोचल्याने सुनावणीला विलंब झाला. अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत. शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी उपस्थित असून त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. अजित पवार गटाकडून सुनावणीसाठी पार्थ पवार निवडणूक आयोगामध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासह अनेक मोठे नेते आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले होते.

जुनेच मुद्दे मांडल्याचा आरोप

अजित पवार गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्रे जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. शरद पवार गटाकडून सातत्याने तेच तेच मुद्दे मांडण्यात येत आहेत. ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आजचा युक्तिवाद संपला असून पुढची सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शरद पवार गटाची कानउघाडणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांची कानउघडणी केली. ज्या मुद्द्यांवर गेल्या सुनावणीत आपण युक्तिवाद केला होता त्याच प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यांचा आपण पुन्हा उल्लेख करु नका, असे निवडणूक आयोगाने त्यांना सांगितले. तेच तेच मुद्दे घेतल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली.

वकिलांमध्ये खडाजंगी

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस कुवर प्रताप सिंह हे शरद पवार गटाकडे आहेत. तसे प्रतिज्ञापत्रही त्यांनी दिले आहे. अजित पवार गटाकडून कुवर प्रताप सिंह यांची खोटी सही करून त्यांचे बोगस प्रतिज्ञापत्रक जमा करण्यात आले असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. अजित पवार गटाने खोटी कागदपत्रे जमा करून निवडणूक आयोगाची दिशाभूल केली असल्याचा दावा शरद पवार गटाने कडून केला.अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष कधी झाले?? अध्यक्षपदाच्या निवडी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी कोण होते??, असे प्रश्न शरद पवार गटाच्या वकिलांनी अजित पवार गटाला केले.

Old arguments of Sharad Pawar group Lawyers open their ears from the Election Commission

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात