विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंफाळ विमानतळावर काल म्हणजेच रविवारी UFO दिसले. सीआयएसएफच्या जवानांनीही ते पाहिले. यानंतर तेथे नागरी विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली. या बातमीनंतर , भारतीय वायुसेनेने तत्काळ आपली दोन राफेल लढाऊ विमाने त्या यूएफओच्या शोधात पाठवली.Two Rafales of the Indian Air Force chased a UFO seen in the sky
भारतीय वायुसेनेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला सांगितले की, इंफाळ विमानतळावरून एका नागरी अधिकाऱ्याकडून UFO दिसल्याविषयीचा संदेश आला होता. यानंतर राफेल लढाऊ विमानांनी हाशिमारा हवाई दलाच्या तळावरून ज्या ठिकाणी यूएफओ दिसले त्या दिशेने तातडीने उड्डाण केले. पण राफेलच्या रडारवर एकही अज्ञात विमान किंवा यान दिसले नाही.
तसेच पायलटलाही आकाशात असे काही दिसले नाही. तितक्यात पहिले लढाऊ विमान परतले. दुसरे राफेल दुहेरी तपासणीसाठी पाठवण्यात आले. पण त्या परिसरात आणि आजूबाजूला कोणताही UFO किंवा एलियनशिप दिसले नाही. पण भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडने तत्काळ आपली हवाई संरक्षण प्रतिसाद यंत्रणा सुरू केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more