“नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर ; शिवसेनेचं नाव सांगणार ” नाही – विनायक राऊत


सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलं आहे. दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं, असंही राऊत म्हणाले आहेत.No, if the same deposit is confiscated, the name of Shiv Sena will not be mentioned – Vinayak Raut


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांवरही टीका केली आहे.नारायण राणेंनी हिंमत असेल तर पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ, मालवणमधून निवडणुक लढवून दाखवावी. नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही.

हिंमत असेल तर रहा उभे विधानसभेला, असं म्हणत राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलं आहे. दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं, असंही राऊत म्हणाले आहेत.सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही असे टीकास्त्रही राऊत यांनी सोडले.पण भविष्यात कधीतरी शिवसेनेच्या अंगावर आलात तर मर्द शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

No, if the same deposit is confiscated, the name of Shiv Sena will not be mentioned – Vinayak Raut

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*