केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य ; विनायक राऊतांनी नावं न घेता नारायण राणेंवर केला आरोप


सिंधुदुर्गमधील त्या मंत्र्याच्या खासगी वैद्यकीय रुग्णालयावर परिणाम नको म्हणून परवानगी नाकारली जात आहे.Union Minister Khara Jharitala Shukracharya; Vinayak Raut accused Narayan Rane without naming him


विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावरुन राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. शिवेसना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले विनायक राऊत ?

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा खरा झारीतील शुक्राचार्य हा जिल्ह्याचं नवी दिल्लीत प्रतिनिधीत्व करणारा केंद्रीय मंत्री आहे. इतर जी शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय आहेत मग यामध्ये सातारा, अलिबाग, पुणे इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांपेक्षा सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत.मात्र, सिंधुदुर्गमधील त्या मंत्र्याच्या खासगी वैद्यकीय रुग्णालयावर परिणाम नको म्हणून परवानगी नाकारली जात आहे.खर्‍या अर्थाने झारीतले शुक्राचार्य असल्याचा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी नाव न घेता नारायण राणेवंर केला आहे.

नारायण राणेंकडून मंत्रिपदाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पुन्हा केंद्रीय मेडिकल असेसमेंट रेकींग बोर्ड (MARB) ने त्रुटी काढल्या असून परवानगी नाकारली आहे. आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करून आणि आपल्या कॉलेजवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्ये अडचणी आणायच्या हे काम केंद्रीय मंत्र्याच्या माध्यमातून होतय आणि तोचं खरा झारीतला शुक्राचार्य असल्याचा आरोप करून राऊत यांनी नारायण राणेवंर जोरदार हल्ला चढवला आहे.

पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करणार

शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले की , आम्ही दिल्लीत पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करणार आहोत. जर परवानगी नाकारण्यात आली तर आम्ही कोर्टात जाऊ पण सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळवणार आहे.

Union Minister Khara Jharitala Shukracharya; Vinayak Raut accused Narayan Rane without naming him

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती