लगेच भाजपशी मनसेच्या युतीचे सूत जुळवू नका; राज ठाकरे यांचे पुण्यात परखड भाष्य

प्रतिनिधी

पुणे – गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ माझ्या भाषणांच्या क्लिपवरून महाराष्ट्रातल्या मनसे-भाजप युतीचे सूत जुळवू नका, असे राज ठाकरे यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.no allience with BJP, says raj thackeray

राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात भेट झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचे राज यांनी मान्य केले. पण लगेच त्याचा अर्थ युती झाली असा कोणी काढू नये, असे राज ठाकरे म्हणाले.



उत्तर भारतीयांवर केलेल्या भाषणांच्या क्लिप राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवल्या असल्याचे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी स्वतः अशा कुठल्याही क्लिप चंद्रकांत पाटील यांना पाठवलेल्या नाहीत.

त्यामुळे त्या क्लिपवरुन तुम्ही मनसे-भाजप युतीची भाकित करू नका. माझी भूमिका स्पष्ट आहे. राज्यांनी आपले अधिकार कसे जपावेत. राज्याचे हित आणि राष्ट्रीय हित एकमेकांच्या विरोधात असू नयेत, ही माझी ठाम भूमिका आहे. ती उत्तर भारतीयांसह सगळ्यांना माहिती आहे.

त्यावर आता चर्चा करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत सुरुवातीच्या काळात घेतलेली भूमिका यामुळे उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याच्या भीतीने भाजप मनसे सोबत जाण्यास तयार नाही. जर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर नक्की विचार होऊ शकतो, असे सूचक देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

त्यामुळे खुद्द राज ठाकरे यांनीच चंद्रकांत पाटील यांना सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाल्याचे सांगत, त्यांच्या भाषणाच्या क्लिप ते चंद्रकांत दादांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण मी क्लिप पाठवलेली नाही. अन्य कोणी पाठवली असेल, तर माहिती नाही, असे राज ठाकरे यांनी सांगून टाकले.

no allience with BJP, says raj thackeray

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात