Big News: मोदी सरकारचं महत्वाच पाऊल : मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू ;आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा


  • केंद्र सरकारनं ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय मोदींनी घेतला आहे .

  • सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एकूण जागांच्या 15 टक्के जागा ह्या UG म्हणजे अँडरग्रॅज्युएट तर पोस्ट ग्रॅज्युएटच्या 50 टक्के सीटस् ह्या ऑल इंडिया कोट्यात येतात.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: मोदी सरकारने ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 27 टक्के तर इडब्ल्यूएसच्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. Big News: Modi government’s important step: OBC and EWS reservation in medical courses; relief to economically weaker candidates

हा निर्णय देशपातळीवर लागू असणार आहे.

 

2021-22 पासून निर्णय लागू-

मेडिकल कोर्समध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण –

2021-22 वर्षासाठी हे आरक्षण लागू असेल. ओबीसी(OBC)तसच ईडब्लूएस (EWS)अशा दोन्ही वर्गांना ह्या आरक्षणाचा लाभ होईल.

यात अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल/डेंटल कोर्स (MBBS/MD/MS/Diploma/ BDS/MDS)मध्ये ओबीसींना 27 टक्के तर EWS च्या विद्यार्थ्यांना 10 टक्के रिजर्वेशनचा फायदा मिळेल. ह्या आरक्षणाचा फायदा ऑल इंडिया कोटा स्कीम(AIQ)च्या माध्यमातून मिळेल.

एका रिपोर्टनुसार-जवळपास 5 हजार 550 विद्यार्थ्यांना मोदी सरकारच्या ह्या निर्णयाचा फायदा होईल. दरवर्षी MBBS च्या दीड हजार OBC विद्यार्थ्यांना तर पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या 2500 ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल. तर EWS च्या आरक्षणाचा लाभ एमबीबीएसमध्ये 550 तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 1000 विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेल.

Big News: Modi government’s important step: OBC and EWS reservation in medical courses; relief to economically weaker candidates

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात