मुंबई क्रूझ ड्रग्जप्रकरणी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि आर्यन खानला या प्रकरणातून वाचवण्यासाठी शाहरुख खानच्या मॅनेजरला 25 कोटींचा सौदा केल्याप्रकरणी मुंबई पोलीस तिसरी नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहेत. मुंबई पोलिसांनी अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला दुसरे समन्स बजावून आणखी वेळ मागितला आहे. आता तिसरे समन्सही बजावले जाऊ शकते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग-ऑन-क्रूझ खंडणी प्रकरणात आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. Mumbai drugs case Nawab Maliks new revelation posts WhatsApp chat between Gosavi and Kashif Khan
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्जप्रकरणी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि आर्यन खानला या प्रकरणातून वाचवण्यासाठी शाहरुख खानच्या मॅनेजरला 25 कोटींचा सौदा केल्याप्रकरणी मुंबई पोलीस तिसरी नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहेत. मुंबई पोलिसांनी अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला दुसरे समन्स बजावून आणखी वेळ मागितला आहे. आता तिसरे समन्सही बजावले जाऊ शकते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग-ऑन-क्रूझ खंडणी प्रकरणात आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवीन व्हॉट्सअॅप चॅट शेअर केले आणि फॅशन टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक काशिफ खान हे या प्रकरणात सामील असल्याचा दावा केला आहे. काशिफ खान आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात संबंध असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आणि त्यावर प्रश्न उपस्थित केला. नवाब मलिक यांनी व्हॉट्सअॅप चॅट शेअर करताना सांगितले की, केपी गोसावी आणि एका इन्फॉर्मरमध्ये व्हॉट्सअॅप चॅट आहे ज्यामध्ये काशिफ खानचा उल्लेख आहे. फॅशन टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक काशिफ खान यांची चौकशी का केली जात नाही, काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यात काय संबंध? असा सवाल मलिक यांनी केला.
Here is a whatsapp chat between K P Gosavi and an informer which mentions Kashiff Khan.Why is Kashiff Khan not being questioned ?What is the relationship between Kashiff Khan and Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/yVjW2LtUWh — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
Here is a whatsapp chat between K P Gosavi and an informer which mentions Kashiff Khan.Why is Kashiff Khan not being questioned ?What is the relationship between Kashiff Khan and Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/yVjW2LtUWh
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
किरण गोसावी हा आर्यन खान ड्रग्जप्रकरणी एनसीबीचा पंच साक्षीदार आहे. आर्यन खान सध्या या प्रकरणात जामिनावर बाहेर आहे. पण आर्यन खानचे हे प्रकरण दडपण्यासाठी किरण गोसावीने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी २५ कोटींची मागणी केली होती, हे नंतर १८ कोटींमध्ये ठरले, असा आरोप आहे. यानंतर गोसावी 50 कोटींची टोकन मनी घेऊन गायब झाला होता. या संपूर्ण व्यवहाराचा खुलासा त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने केला होता. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
यापूर्वी किरण गोसावी यांच्या फसवणुकीची काही प्रकरणेही समोर आली होती. यापैकी एका प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या गोसावी न्यायालयीन कोठडीत आहेत. याचप्रकरणी गोसावी यांची महिला सहकारी कुसुम गायकवाड हिला शुक्रवारी पुणे पोलिसांनी अटक केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App