अमोल कोल्हे यांचा विक्रम गोखलेंना खोचक सवाल ; म्हणाले – रूग्णालयात पेशंटला रक्त भगव्याच असेल तरच देणार का ?


माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले होते.Amol Kolhe’s sharp question to Vikram Gokhale; Said – Will the patient be given blood in the hospital only if it is saffron?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कंगना राणावत ने मागील आठवड्यात भारतीय स्वातंत्र्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होत. दरम्यान दरम्यान या वक्तव्याला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले होते. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आणि कलाकारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.दरम्यान आता अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही विक्रम गोखले यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

विक्रम गोखले काय म्हणले होते

विक्रम गोखले म्हणाले होते की, सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तरुण पिढीला गाफील ठेवण्यासाठी इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे. या दुष्कृत्यांना आळा घालण्याची वेळ आली आहे. माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.



अमोल कोल्हे प्रत्युत्तर देताना काय म्हणले

अमोल कोल्हे विक्रम गोखलेंना प्रत्युत्तर देत म्हणाले की, कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या त्याच भगव्याचं रक्त असेल तरच त्याला रक्त देणार, जर पेशंट हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? असा प्रश्न अमोल कोल्हे केला आहे.

पुढे कोल्हे म्हणाले की , वसुदैवं कुटुंबकम ही आपल्या संतांची शिकवण आणि परंपरा आहे. एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गात असताना दुसरीकडे वसदैवं कुटुंबकमला तिलांजली देता, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी गोखलेंना सडेतोड उत्तर दिल आहे.

Amol Kolhe’s sharp question to Vikram Gokhale; Said – Will the patient be given blood in the hospital only if it is saffron?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात