मुंबईतील कांजूरमार्ग येथे भीषण आगीची घटना घडली. ही आग अवजड औद्योगिक वसाहतीत लागली आहे. कांजूरमार्ग पूर्व येथील पोलीस ठाण्याजवळील सॅमसंग कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सेवा केंद्राला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी पाण्याचे चार टँकरही पाठवण्यात आले. रात्री 8.45 वाजता आग लागली. Fire break out in mumbai kanjurmarg heavy industrial estate
वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईतील कांजूरमार्ग येथे भीषण आगीची घटना घडली. ही आग अवजड औद्योगिक वसाहतीत लागली आहे. कांजूरमार्ग पूर्व येथील पोलीस ठाण्याजवळील सॅमसंग कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सेवा केंद्राला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी पाण्याचे चार टँकरही पाठवण्यात आले. रात्री 8.45 वाजता आग लागली.
हे ठिकाण डब्बावाला कंपाउंड आणि एपेक्स कंपाउंडजवळ आहे. जवळच निवासी वस्ती आहे. काही वेळापूर्वी आगीच्या ठिकाणाहून सिलिंडरचा स्फोट झाल्यासारखे आवाज येत होते. रात्री 11.45च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, अजूनही आग पूर्णपणे विझलेली नाही. आग विझविण्याचे काम सुरू आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
ऑनलाइन डिलिव्हरीसाठी आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू येथे ठेवल्या जातात. म्हणजेच ही जागा गोदाम म्हणून वापरली जाते. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीसाठी येथे सामान आणले जाते. सध्या ही आग का लागली आणि सुरू झाल्यानंतर आगीने एवढा भीषण रूप कसा घेतला याची माहिती मिळू शकलेली नाही.
डीसीपी प्रशांत कदम (झोन-7) यांनी या घटनेबाबत सांगितले की, ‘कांजूरमार्ग पूर्व सॅमसंग सर्व्हिस सेंटरला रात्री ९ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या येथे आहेत. स्थानिक लोकांना इतरत्र हलवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे.
सॅमसंगच्या सर्व्हिंग सेंटरजवळ इतर तीन कंपन्यांची गोदामेही येथे आहेत. यापैकी एक सफोला खाद्यतेलाचे गोदामही आहे. रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत आगीच्या ज्वाळा मोठ्या उंचीवर जाताना दिसत होत्या. आगीचे हे भीषण रूप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कांजूरमार्गजवळ एक झोपडपट्टीही आहे. खबरदारी म्हणून झोपडपट्टीत येण्या-जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून रात्री अकरा वाजेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आणली. आग लवकरात लवकर आटोक्यात आणणे गरजेचे होते. कारण आग लवकर आटोक्यात आली नसती, तर ती जवळपासच्या वस्तीत पसरण्याचा धोका होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App