न्यायालयाकडून फटका खाल्यानंतर कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत मुख्यमंत्र्यांचे नरम फेसबुक लाइव्ह


  • प्रश्न सोडवून श्रेय़ घ्या, मुख्यमंत्र्यांचे भाजपला आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत सटका खाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी भाजपला कारशेडचा प्रश्न तुम्ही सोडवा, मी तुम्हाला श्रेय देता, अशी नरमाईची भाषा वापरणारे फेसबुक लाइव्ह केले आणि मी स्वतःसाठी नाही, तक मुंबईकरांसाठी अहंकारी आहे, अशी मखलाशी केली.

uddhav thackeray urges bjp leaders to resolve kanjurmarg metro carshed issue

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हची भाषा अहंकारी नसल्याची असली तरी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेखाली त्यांचेच घोंगडे अडकले असल्याची कबुली देणारी होती. केंद्र सरकार दावा सोडणार नाही. उच्च न्यायायलापासून ते सर्वोच्च न्यायायलापर्यंत कोठेही गेले तरी आपल्याला हवा तसा निर्णय लागणार नाही, हे समजून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चला एकत्र येऊ या. बसून चर्चा करून हा प्रश्न सोडवू या, असे आवाहन विरोधी भाजपला केल्याचे स्पष्ट झाले. यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव वापरले. ते जर प्रधान सेवक आहेत, तर मग आपण कोण आहोत, आपणही जनतेचे सेवकच आहोत, असे ते म्हणाले. त्याचवेळी मेट्रो कारशेडसाठी घाईत निर्णय घेणार नसल्याचे सूचित करून स्वतःच्या सेफ पॅसेजची सोयही करवून ठेवली.

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या फेसबुक लाइव्हची सुरवात जरी कोरोना, अनलॉक, शेतकरी राजा, वगैरे शब्दांनी सजवली असली तरी मुख्यतः त्यांना खुलासे मेट्रो कारशेडबाबातच करायचे होते हे काही लपून राहिले नाही. त्यामुळे फेसबुक लाइव्हचा सर्वाधिक वेळ त्यांनी कांजूरमार्गच्या जागेचे महत्त्व, प्रकल्पाची व्याप्ती, त्याला लागणारा कालावधी हे समजून सांगण्यात घालविला. यातूनच नेमके कोणाचे घोंगडे कांजूरमार्गच्या जागेत अडकले आहे, हे या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे झाले.

uddhav thackeray urges bjp leaders to resolve kanjurmarg metro carshed issue

बाकीच्या वेळेतही मुख्यमंत्री घरात बसून कारभार करतात, हा महाराष्ट्रात पसरलेला समज दूर करण्यात गेला. त्यासाठी समृद्धी महामार्ग, मुंबईतला कोस्टल रोड, लोणावळ्याजवळचा बायपास आदींच्या पाहण्या प्रत्यक्ष तेथे जाऊन कशा केल्या हे सांगण्यात घालविला. पण मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला होता. त्यावेळच्या पुलावरून केलेल्या पाहणीचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला नाही. बाकी विधानसभेत केलेल्या भाषणाचीच पुनरावृत्ती मुख्यमंत्र्यांनी केली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात