या आदेशात पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, तसेच सभा आयोजित करणे, शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.Now a curfew has been imposed in ‘this’ district till November 20
विशेष प्रतिनिधी
सांगली : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने १२ नोव्हेंबरला पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या.यामुळे काही समाज कंटकांच्या माध्यमातून दोन समाजात, किंवा दोन गटांत तेढ निर्माण होऊ शकतो.त्यामुळे सांगली जिल्ह्यात २० नाेव्हेंबरपर्यंत जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात २० नाेव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशात पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, तसेच सभा आयोजित करणे, शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सांगलीत जमावबंदी आदेश लागू केल्याने संभाजी भिडे नेतृत्वाखाली शिवप्रतिष्ठानाने आज (मंगळवार) शहरात आयोजित केलेली निषेध सभा स्थगित केल्याची माहिती दिली. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने सभा स्थगित करीत आहाेत अशी माहिती शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान जिल्हा प्रशासनास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा विभागाच्या माध्यमातून अमरावती येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ व रझा अकादमीवर संपूर्ण बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी हे निवेदन अमर बेंद्रे, धनंजय खोले, शुभम शिंदे, अजिंक्य गुजर, हेमंत खटावकर यांच्या शिवप्रतिष्ठानच्या सदस्यांनी उपजिल्हाधिकारी सुनील थाेरवे यांना दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App