आजपासून पुणे जिल्ह्यात कलम १४४ लागू


जमावबंदी आजपासून म्हणजेच 14 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आली असून 20 नोव्हेंबर रोजीच्या रात्रीच्या 12 पर्यंत असणार आहेSection 144 is applicable in Pune district from today


विशेष प्रतिनिधी

पुणे : त्रिपुरा घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव येथे पडले आहेत. शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर शनिवारी अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. अमरावतीमध्ये बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली.

त्रिपुरा घटनेच्या याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदीचा आदेश (144 कलम) लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी आजपासून म्हणजेच 14 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आली असून 20 नोव्हेंबर रोजीच्या रात्रीच्या 12 पर्यंत असणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.



दरम्यान कोणत्याही व्यक्तीस इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌स अप आदी समाज माध्यमांवर जातीय तणाव निर्माण होईल, अशा गोष्टी प्रसारीत करण्यास मनाई करण्यात आली आहे. जर या सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण झाल्यास त्याला ॲडमिन जबाबदार असतील.

प्रसिद्धीपत्रकामध्ये असे म्हटले आहे की , चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणे, ५ किंवा त्यापेक्षा पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास, शस्त्र किंवा लाठी-काठी बाळगण्यासही मनाई असणार आहे. जातीय तणाव निर्माण होईल, अशा मजुकराचे फ्लेक्स लावणे व घोषणा देणे, यास बंदी असणार आहे, असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी पत्रकामध्ये म्हंटलं आहे.

Section 144 is applicable in Pune district from today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात