मुंबई : दादर परिसरातल्या डॉ. लाल पॅथलॅबमधील १२ कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह ; महापालिकेने लॅब केली सील


सर्वात आधी पॅथलॅबमध्ये कार्यरत असलेला ऑफिस बॉय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.Mumbai:  Dadar area. 12 employees in Dr Red Pathlab found corona positive; Municipal sealed lab


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ३५८ वर पोहोचली आहे. यात महाराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ८८ रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान मुंबईतील दादर परिसरात असलेल्या डॉ. लाल पॅथलॅबमधील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असल्याची माहिती मिळाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पॅथलॅबचं कार्यालय सील केलं.



त्याचबरोबर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.त्याचबरोबर मागील काही दिवसांत ज्यांनी ज्यांनी लाल पॅथलॅबमध्ये जाऊन तपासण्या केल्या आहेत. त्या सर्वांना कोरोना चाचण्या करण्याची सूचना महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

सर्वात आधी पॅथलॅबमध्ये कार्यरत असलेला ऑफिस बॉय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.यावेळी ऑफिस बॉयच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

३९ जणांपैकी १२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं. मुंबईत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्णही आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवण्यात आले आहेत.

Mumbai :  Dadar area. 12 employees in Dr Red Pathlab found corona positive; Municipal sealed lab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात